Sanjay Savkare : असंवेदनशील वक्तव्यानंतर मंत्री सावकारे यांची सारवासारव; म्हणाले, 'माझा तसा उद्देश नव्हता. पण, माफी मागतो'

Sanjay Savkare On Pune Shivshahi Bus Case : पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये मंगळवारी पहाटे धक्कादायक घडना घडली. येथे एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.
Sanjay Savkare On Pune Shivshahi Bus Case
Sanjay Savkare On Pune Shivshahi Bus CaseSarkarnama
Published on
Updated on

Pune News : स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्काराच्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. येथे शिवशाही बसमध्ये मंगळवारी पहाटे एका २६ वर्षीय तरुणीवर एका नराधमाने बलात्कार केला. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यात आता आरोपीच्या वकीलांने, मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली. सहमती हे संबंध झाल्याचा युक्तिवाद केल्याने आता संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या असंवेदनशील वक्तव्यामुळे यात आगीत तेल ओतण्याचे काम केलं आहे. त्यांच्या त्या वक्तव्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. यानंतर आता मंत्री सावकारे आणि योगेश कदम यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे.

मंगळवारी पहाटेच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकात उभ्या असणाऱ्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणावरून राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असातानाच राज्यातील दोन मंत्र्यांनी बेजबाबदार वक्तव्य केलीत. यावरून राज्यभर टीकेची झोड उठली होती. दरम्यान, मंत्री संजय सावकारे यांनी या प्रकरणावर असंवेदनशील वक्तव्य केले होते. त्यांनी, अशा घटना पुण्यातच नव्हे तर संपूर्ण देशात घडतच असतात, असे वादग्रस्त विधान केले होतं. यानंतर त्यांच्या विधानाबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

त्यानंतर आता, सावकारे यांनी आपल्या विधानाबाबत माफी मागितली आहे. त्यांनी, ‘माझ्या बोलण्याचा कोणताही तसा उद्देश नव्हता. माझ्या विधानाचा विपर्यास केल्याचे म्हटलं आहे. तसेच त्यांनी, बलात्कार घडतात असं मी, बोललेलो नाही. सर्वात आधी जर कोणाचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो. माझ्या बोलण्याचा तसा कोणताही उद्देश नव्हता. मी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं होतं. पण माझ्या त्या विधानाचाच विपर्यास करण्यात आला. तरी माझ्या विधानामुळे कोणाची मने दुखावली गेली असतील तर मी माफी मागतो. तसेच महाराष्ट्रातील सरकार अशा घटनांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असून अशा घटनांमध्ये तातडीने कारवाई केली जातेय, असेही सावकारे यांनी म्हटलं आहे.

Sanjay Savkare On Pune Shivshahi Bus Case
Sanjay Savkare Politics: मंत्री संजय सावकारे यांची भर सभेतच धक्कादायक कबुली, म्हणाले...

कदम यांचीही सारवासारव

स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये झालेल्या घटनेबाबत बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील आता सारवासारव केली आहे. योगेश कदम यांनी, काल मी जे विधान केलं त्याचा विरोधकांकडून चूकीचा अर्थ काढण्यात आला होता. मी स्वारगेट आगारात जेव्हा भेट दिली, तेव्हा मला दिसलं की, ती रहदारीची जागा होती. रहदारीचा परिसर असूनदेखील आमच्या भगिनीवर अत्याचार होतोच कसा? कुणीच कसे मदतीसाठी पुढे आलं नाही? हाच प्रश्न मी पोलिसांनी केला होता. पोलिसांनी मला जे सांगितलं तेच मी पत्रकार परिषदेत सांगितलं. पण माझ्या विधानाचा विपर्यास करून त्याचा राजकारणासाठी वापर केला गेला. जे दुर्दैवी असल्याचे योगेश कदम यांनी म्हटलं आहे.

Sanjay Savkare On Pune Shivshahi Bus Case
Pune Rape Crime: योगेश कदमांनंतर आता भाजप मंत्र्यांचं स्वारगेट घटनेबाबत वादग्रस्त विधान; म्हणाले, अशा घटना घडतच असतात, कारवाई...

काय म्हणाले होते कदम?

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी, स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये जी घटना घडली, ती घटना कुठल्याही फोर्सफुली किंवा स्ट्रगलने झालेली नाही. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणी जवळ आसपास दहा ते पंधरा लोकं आजू बाजूला उपस्थित होते. पण कोणालाही शंका आलेली नाही, असं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावररून राज्यभर जोरदार टीका झाली होती. तर विरोधकांनी कदम यांच्या विधानावरून टीका करताना त्यांची मंत्रिमडळातून हाकालपट्टी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com