Satej Patil Gokul  sarkarnama
महाराष्ट्र

Satej Patil : सतेज पाटील 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, मुंबईत दाखल; सरकार विरोधात डाव टाकणार, 'गोकुळ' राज्यभर गाजणार!

Satej Patil Gokul : गोकुळमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील हे मुंबईत दाखल झाले आहेत. ते आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत.

Roshan More

Gokul News : सरकारने गोकुळ दूध संघात चार शासकीय सदस्यांच्या नेमणूकीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे सतेज पाटील यांचा बहुमताचा आकडा बिघडला असून त्यांचा अध्यक्ष होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर सतेज पाटील हे अॅक्शन मोडवर आले आहेत. ते आज सकाळी मुंबईकडे रवाना झाले आहे.

मुंबईत ते आज वेगवेगळ्या नेत्यांसोबत भेटीगाठी घेणार असून, दुपारी पत्रकार परिषदही घेणार आहेत. ते पत्रकार परिषदेमध्ये नेमकी काय भूमिका मा्ंडणार याची उत्सुकता आहे. 'गोकुळ'चा मुद्दा ते राज्यभर घेऊन जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यभरातून याला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे महायुती विरोधात वातावरण तापवण्यात येणार आहे.

दरम्यान, गोकुळमधील राजकीय घडामोडींवर सतेज पाटील आज पत्रकार परिषदेत काय भूमिका मांडणार? त्यांच्या मुंबईतील भेटीगाठींमधून कोणती नवी रणनीती समोर येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

सतेज पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आम्हाला कोणत्याही संकटातून सहीसलामत बाहेर पडण्याची ताकद देते. या संकटातून बाहेर पडण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेस सुप्रीम कोर्टात जाणार

राज्य सरकराने ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर पाच शासन नियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात काँग्रेस सुप्रीम कोर्टात जाणार आहे.काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT