Satej Patil Rahul Gandhi Gokul issu sarkarnama
महाराष्ट्र

Satej Patil Politics : सतेज पाटलांना 'गोकुळ'च्या लढ्यात हात्तीच बळ! राहुल गांधींनी पाठींबा देताच मोठी घोषणा, न्यायालयात अन् रस्त्यावरही...

Satej Patil Rahul Gandhi Gokul : सतेज पाटील यांना राहुल गांधी यांना पाठींबा दिला आहे. गोकुळमध्ये बहुमत जोरण्यासाठी जनादेशात भेसळ करण्याचा प्रकार भाजपने केल्याची टीका त्यांनी केली आहे.

Roshan More

Satej Patil News : 'गोकुळ' शासन नियुक्त सदस्य नेमून सतेज पाटलांचे बहुमत कमकुवत करण्याच्या मुद्दा राष्ट्रीय पातळीवर गाजतो आहे. काँग्रेसकडून या प्रश्न न्यायालयात जाण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यातच राहुल गांधी यांनी ट्विट करत सतेज पाटलांना पाठींबा दिला.

ते म्हणाले, सत्ता वाचविण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जात आहे. निवडणुकीनंतर नियम बदलून चार संचालकांची नियुक्ती करून १२ चे संख्याबळ १६ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा दूध उत्पादकांच्या मतांचा अपहार असून, जनादेशात भेसळ करण्याचा प्रकार आहे.

राहुल गांधींच्या पाठींब्यानंतर सतेज पाटील यांनी त्यांचे आभार मानत म्हटले की, कोल्हापूरच्या साडेपाच लाख शेतकऱ्यांचा आवाज बनण्यासाठी राहुलजी धन्यवाद. गोकुळमधील जनादेश हा शेतकऱ्यांचा आहे. कोर्टातही लढू आणि रस्त्यावरही.

मुंबईत रणनीती ठरणार

सतेज पाटील हे आज मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. ते आपले मुद्दे या पत्रकार परिषदेमधून मांडतील. तसेच ते काही वरिष्ठ नेत्यांची भेट देखील घेणार आहेत. त्यामुळे गोकुळमध्ये पुढील रणनीती काय असावी, यावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी काँग्रेस महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे जाहीर केले.

सरकारचा नेमका निर्णय काय?

राज्यातील ज्या सहकारी संघिक संस्थांची वार्षिक उलाढाल पाचशे कोटींहून अधिक आहे, अशा संस्थांच्या समित्यांवर शासन नामनिर्देशित पाच सदस्यांची नियुक्ती होणार. एक सहाय्यक निबंधकाच्या दर्जापेक्षा कमी नसलेला अधिकारी आणि संस्थेच्या कार्याचा अनुभव असलेल्या चार व्यक्तींची नियुक्ती होणार. शासकीय अधिकाऱ्याला मताचा अधिकार नसेल. इतर चौघांना संचालक मंडळात मताचा अधिकार, पण ते संस्थेच्या पदाधिकारी पदाच्या निवडणुकीस पात्र राहणार नाहीत. ही सुधारणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना लागू राहणार नाही, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान,हा निर्णय गोकुळमध्ये महायुतीकडे बहुमत नसताना सत्ता स्थापन करण्यासाठी घेतल्याची टीका केली जात आहे.

हसन मुश्रीफांची राहुल गांधींवर टीका

राहुल गांधींच्या टिट्व नंतर मंत्री हसन मुश्रीफांवर टीका करत म्हटले की, राहुल गांधींना गोकुळचा विषयच समजलेला नाही. कोरम पूर्ण झाल्याशिवाय अध्यक्ष निवड करता येणार नाही. सभासदांनी आम्हाला सतेज पाटलांचा चेअरमन करण्यासाठी कौल दिलेला नाही. 10 तारखेला सभा झाली असती तरी मागीलवेळीसारखीच स्थिती असती. 3 सभांमध्ये अध्यक्ष निवड न झाल्यास प्रशासक येतो. हा डेडलॉक तोडण्यासाठीच आणि गोकुळमधील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी शासननियुक्त संचालकांचा निर्णय घेतला आहे. सतेज पाटील यांच्याकडे बहुमत असेल तर त्यांनी कोरम पूर्ण करावा, अध्यक्ष बनवावा, आम्ही त्यांना अडवलेलं नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT