Assembly Election 2024 Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election 2024 : 'मविआ' आणि महायुतीमधील जागा वाटप फायनल? जाणून घ्या, कोणाला किती जागा

Pradeep Pendhare

Mumbai News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होईल. निवडणुकीला समोरं जाताना महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागा वाटप जवळपास निश्चित झालं आहे.

येत्या दोन ते तीन दिवसात जागा वाटपाची दोन्हींकडून घोषणा होणं अपेक्षित आहे. मात्र जागा वाटपाची घोषणा झाल्यानंतर मविआ आणि महायुतीला बंडखोरांची डोकेदुखी वाढेल, असे अंदाज वर्तवला जात आहे.

महायुतीत भाजप (BJP) 150 ते 160 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 80 ते 90 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 40 तेत 50 जागा मिळतील. महायुतीत भाजप हा मोठा पक्ष ठरणार आहे. भाजपने किमान '90 प्लस' जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलं आहे. आता सध्या त्यांची विधानसभेत 105 सदस्य संख्या आहे.

महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने (Shiv Sena) 50 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. याशिवाय अजित पवार यांच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी निम्म्या जागा जिंकल्यास राज्यात महायुती सरकार पुन्हा सत्तेत येईल. सत्ता स्थापनेजवळ जाताच, अपक्षांचा देखील पाठिंबा घेण्याची रणनीती भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखल्याचं सांगितलं जात आहे.

महाविकास आघाडीतील काँग्रेसला 110 ते 125 जागा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकेर पक्षांला 80 ते 90 जागा लढवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला 80 ते 90 जागा लढणार आहे. उर्वरीत जागा महाविकास आघाडीतील डाव्या आणि पुरोगामी विचारांच्या पक्षांना देण्याचा विचार केला आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 14 जागा जिंकून महाराष्ट्रात सर्वात जास्त जागांवर मुसंडी मारली आहे. त्याचपद्धतीने विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकण्याच्या तयारीत आहे. या विधासभा निवडणुकीत काँग्रेसने 80 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने 50 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या तयारी आहे.

शिवसेना ठाकरे पक्षाला काय हवंय?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देखील विधानसभा निवडणुकीत स्ट्राईक रेट चांगला ठेवून मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा दावा करायचा आहे. त्यानुसार शिवसेने मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या मतदारसंघात मोठा ताकद लावल्याचे सूत्रांनी सांगितले.

महायुतीचे जागा वाटपाचे सूत्र

भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह नुकताच मुंबई दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जागा वाटपावर चर्चा करत 150:85:53 असं सूत्र ठेवलं आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणुकीच्या निकालानंतर ठरवला जाईल, असं भाजपच्या एका मोठ्या नेत्यानं म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT