Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar Video : हाॅस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केलेल्या उमेदवाराच्या सभेला मुख्यमंत्री का नाही आले? खरं कारण अजितदादांनी सांगितलं

Serampore constituency Ajit Pawar Eknath Shinde : अजित पवार म्हणाले, श्रीरामपूर मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार लहू कानडे आहेत. भाऊसाहेब कांबळे यांना फाॅर्म मागे घेण्यासाठी फोन करण्यात आला होता.

Roshan More

Ajit Pawar News : श्रीरामपूरमधील शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार होती. मुख्यमंत्र्यांची ही सभा अचानक रद्द झाली. सभा रद्द झाल्याने उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचे ब्लडप्रेशर वाढले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिंदे यांची सभा का रद्द झाली याचे कारण आता समोर आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीरामपूरमध्येच आपले उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांची सभा रद्द होण्याचे कारण जाहीर केले. मुख्यमंत्र्यांना आपणच सभा घेऊ नका म्हणून विनंती केल्याचे अजित पवारांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले, श्रीरामपूर मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार लहू कानडे आहेत. भाऊसाहेब कांबळे यांना फाॅर्म मागे घेण्यासाठी फोन करण्यात आला होता. मात्र, त्यांनी त्यांचा फाॅर्म कायम ठेवला. मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीसजी यांच्यासोबतच्या बैठकीत आमचे ठरले होते.

नेवाशाच्या जागेवर आमचे उमेदवार अब्दुल शेख उभे राहणार होते. त्यांना आम्ही एबी फाॅर्म दिला होता. मात्र, तेथून एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला उमेदवारी दिली. त्यामुळे अब्दुल यांनी माघार घेतली. आम्ही नेवाशातून माघार घेतली. अब्दुल शिंदेंच्या उमेदवाराचा प्रचार देखील करतोय. कोणी काही सांगो पण लहू कानडे हेच श्रीरामपूरमधील महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत, असे देखील अजित पवारांनी ठासून सांगितले.

मी खरं बोलणारा कार्यकर्ता

अजित पवार म्हणाले की, ' इथे काही सांगतात कोणी आजारी होतं म्हणून मुख्यमंत्र्यांची सभा रद्द झाली. पण कोणी आजारी नव्हतं. मी सांगितलं म्हणून मुख्यमंत्र्यांची सभा रद्द केली. सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. अजितदादा खरा बोलणारा कार्यकर्ता आहे. '

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT