Nagpur News: विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत चर्चा रंगल्या आहेत. महायुतीपेक्षा महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठीचे 'भावी मुख्यमंत्री'अशी बॅनरबाजी केली आहे. भाजपचे नेते, मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या खास शैलीत मुख्यमंत्रीपदाचे बांशिंग बांधून बसलेल्या नेत्यांची कानउघाडणी केली.
"राज्यातील अनेक नेत्यांना मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडू लागले आहे. मला याबाबत एकाने विचार तेव्हा मी त्याला 'थांब टकल्या भांग पाडतो' हा सिनेमा बघितला का? अशी विचारणा केली. त्या सिनेमामध्ये केस नसलेला व्यक्ती डोक्यावर कंगवा फिरत होता. सध्या अनेक टक्कलवाले कंगवा घेऊन फिरत आहेत," अशा शब्दात गडकरी यांनी सर्वपक्षीय 'भावी मुख्यमंत्र्यांची' खिल्ली उडवली आहे.
मुख्यमंत्री महाराष्ट्राची जनता ठरवते. यासाठी निवडून यावे लागते, पक्षाकडे बहूमत असावे लागते, असे सांगत गडकरी यांनी मुख्यमंत्रीपदासाठी इच्चुक असलेल्यांना चिमटा काढला आहे. ते काटोल येथे बोलत होते.
काटोल विधानसभा मतदारसंघात भाजपने चरणसिंग ठाकूर तर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी भाषणात गडकरी यांनी टोलेबाजी केली.
काटोलमधील उमेदवारीवरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे पुत्र सलील देशमुख यांच्यामध्येच साठी स्पर्धा सुरू होती. अनिल देशमुखांनी माघार घेतली. त्यांच्या मुलाला तिकीट मिळाले आहे. हाच धागा पकडून गडकरी यांनी देशमुखांवर टोलेबाजी केली. "टीव्ही फोडण्याची धमकी दिली म्हणून बापाने मुलाला तिकीट दिले, असा टोला गडकरी यांनी हाणला.
'काटोलमध्ये दमदार नेतृत्व आणि कर्तृत्व' असे पोस्टर पाहिले. यांनी काय दमदार काम केले मला माहिती नाही, तुम्ही सांगा असे म्हणत गडकरी यांनी अनिल देशमुखावर टीकेचे बाण सोडले. 'जे नेते आपल्या कामावर निवडून येत नाही, ते जातीच्या ढाली वापरतात. जे काम करतात त्यांना जातीची गोष्ट करण्याची गरज नाही,' असे गडकरी म्हणाले.
माय, बापाने नव्हे तर जनतेने म्हटले पाहिजे मुलाला तिकट द्या! मुलाने घरचा टीव्ही फोडण्याची धमकी दिली म्हणून कोणी तिकीट देतो का, असा सवाल करताच सभेत एकच हशा पिकला. आमच्या पक्षात हे चालत नाही. खासदाराच्या पोटातून खासदार आणि आमदाराच्या पोटातून आमदार हे चालणार नाही. काँग्रेसमध्ये मुलाबाळांना तिकीट देऊन घराणे चालवले जाते, अशीही टीका त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.