Uddhav Thackeray - Shambhuraj Desai Sarkarnama
महाराष्ट्र

Shambhuraj Desai Video : शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला; धरसोड वृत्ती, खुर्चीसाठी हिंदुत्व म्हणत सगळंच काढलं

Uddhav Thackeray Ramraksha Andolan Hindutva : रामरक्षा आंदोलनाची घोषणा करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर शंभूराज देसाई यांनी जोरदार टीका केली आहे. हिंदुत्वावर बोलणार ठाकरे काँग्रेससोबत का गेले? असा सवाल देखील त्यांनी केला.

Roshan More

Shambhuraj Desai News : उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या 'रामरक्षा अभियान' आणि 'महाआरती'च्या घोषणेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंच्या या नव्या मोहिमेवर सडकून टीका केली असून, त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला 'धरसोड राजकारण' असे म्हटले आहे.

"स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आणि सत्तेसाठी कधीही हिंदुत्व सोडायचे आणि कधीही पकडायचे, हे धोरण जनता ओळखून आहे," असा घणाघात देसाई यांनी केला.

देसाई म्हणाले, ' २०१९ ते २०२२ मध्ये ही भूमिका कुठे गेली होती. महाविकास आघाडीमध्ये उबाठाने ही भूमिका का स्वीकारली नाही? हिंदुत्वावादी लोक आपल्यापासून लांब गेले आहेत. त्यांना परत आपल्याकडे आणण्यासाठी हे चाललं आहे.'

'प्रभुरामाच्या महाआरतीचा हा विषय आहे. स्वतःला सोयीस्कर असेल तेव्हा धरायचं आणि सत्ता हवी असेल, महाविकास आघाडी करून सत्ता मिळवायची असेल तेव्हा सोडायचं. ही धरसोड वृत्ती देशातील आणि महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी जनता हे पूर्णपणे ओळखते.' , असा टोला देखील ठाकरेंना देसाई यांनी लगावला.

बाळासाहेबांचे विचार सोडले...

'२०१९ ते २०२२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंचे विचार कोणी सोडले? काँग्रेसला बरोबर घेणार नाही, काँग्रेससोबत जाणार नाही, हे बाळासाहेब म्हणाले होते. त्याच काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात म्हणून मी म्हणालो धरसोड वृत्ती आहे. स्वत:ला फायद्याचे असेल तेव्हा धरायचं.', अशी टीका देखील त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT