Sharad Pawar 60 years in Parliamentary Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात तसेच राष्ट्रीय पातळीवर विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला काल (रविवारी) 60 वर्ष झाली आहे.
महाराष्ट्र विधानसभेत सहा वेळा सदस्य म्हणून, एकदा विधानपरिषदेत, सात वेळा लोकसभेत आणि दोन वेळा राज्यसभेत प्रतिनिधित्व करत त्यांनी संसदीय कारकीर्दीत भरीव कामगिरी बजावली आहे.
पण शरद पवार यांच्या कारकिर्दीची सुरवात बारामतीतून नव्हे तर कुठल्या शहरातून झाली होती, याविषयी अनेकांना कुतुहूल आहे. त्यांची कर्मभूमी सुरवातीला बारामती असली तरी पुढे मुख्यमंत्री झाल्यानंतर अख्या महाराष्ट्र हीच त्यांची राजकीय कर्मभूमी झाली. बारामतीनंतर त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पुण्यालाही तेवढेच महत्व दिले. पुणे आणि परिसराचा कायापालट करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
शरद पवार यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात पुण्यातील सोमवार पेठ येथे काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या अध्यक्षपदापासून केली. पुढे पवारांना युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची नामी संधी प्राप्त झाली. त्यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन दादर या नव्या वास्तूत आले होते. तेव्हा सरचिटणीसपदी पुण्याचे क्रीडाप्रेमी मोहन धारिया होते.
महाराष्ट्र विधानसभेत १९६७ ला पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यापासून आजपर्यंत संसदीय सदस्य म्हणून राहण्याची अनोखी कामगिरी करणारे शरद पवार हे देशातील पहिल्या क्रमांकाचे नेते आहेत.
पवार हे विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य, विधानसभा आमदार व विधानपरिषद आमदार, संसदेची दोन्ही सभागृहाचे सदस्य लोकसभा खासदार व राज्यसभा खासदार अशी त्याची कामगिरी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 1967 मध्ये सुरू झालेल्या जनसेवेच्या प्रवासाने सहा दशकांचा टप्पा गाठला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.