Sunetra Pawar NCP Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar NCP MLAs : शरद पवारांच्या संपर्कात अजितदादांचे 22 ते 26 आमदार? फडणवीस अलर्ट; महायुतीत मोठी खळबळ!

Maharashtra Politics: 22 to 26 Ajit Pawar faction MLAs are reportedly in touch with Sharad Pawar. Devendra Fadnavis takes note amid NCP merger discussions : अजित पवार राष्ट्रवादीतील आमदारांच्या संभाव्य हालचालींची भाजपने घेतली गंभीर दखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठकीनंतर राजकीय चर्चांना उधाण

Pradeep Pendhare

Maharashtra Politics : राज्यातील सत्ताधारी महायुतीत टेन्शन वाढण्यासारखी राजकीय घडामोडीची माहिती समोर येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना दोन्ही बाजूने पूर्णविराम देण्यात आला असला, तरी शरद पवार यांच्या संपर्कात अजित पवार राष्ट्रवादीचे 22 ते 26 आमदार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, याची दखल भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

राष्ट्रवादीच्या (NCP) विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच, महायुतीमधील भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा झाली नाही असे सांगितले जात असले, तरी भाजपकडून याची गंभीर दखल घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या बैठकीत कोणती राष्ट्रवादी कोणत्या राष्ट्रवादीत विलीन होणार याची दखल घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे 22 ते 26 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. तशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ही बाब सत्ताधारी म्हणून महायुतीसाठी टेन्शन वाढवणारी आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेतली असून, आमदारांची भूमिका जाणून घेत, काही सूचना दिल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. प्रशासकीय कामकाजाचा या बैठकीत आढावा घेण्यात आल्याचे फडणवीसांकडन सांगण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बैठकीनंतरची प्रतिक्रिया मात्र अजून समोर आलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना गेल्या आठवड्यापासून चांगलाच जोर धरला आहे. यात चर्चांमध्ये सर्वाधिक अस्वस्थता भाजपमध्ये पसरली आहे. सत्ताधारी महायुती अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते अजितदादा असताना, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा कशा झाल्या होत्या, याचे दाखले देत या चर्चांना अधिकची फोडणी दिली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना शरद पवारांकडून पूर्णविराम देण्यात आल्याचे म्हटले आहे. माझा भाऊ अजितदादा होता, तोपर्यंत विलीनीकरणाची चर्चा होती, तारीखही ठरली होती. ज्या दिवशी भाऊ गेला, त्या दिवशी विलीनीकरणाबाबत माझ्या पक्षाने पूर्णविराम दिला, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT