NCP Merger : अजितदादांसमोरच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा 45 मिनिटे खल; जयंत पाटलांचा 'तो' प्रश्न काय होता? भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट!

Chhagan Bhujbal reveals details 45-minute NCP merger discussion involving Sharad Pawar, Ajit Pawar and Jayant Patil. Know what question was raised about NDA and Sunetra Pawar role : शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात माझ्यासमोरच झाली होती विलीनीकरणावर चर्चा; आता अंतिम निर्णय सुनेत्रा पवार घेणार असल्याचे छगन भुजबळांचे विधान.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Politics NCP Unity : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा थेट दिल्लीमध्ये होत आहेत. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शहा रविवार आणि सोमवार (ता. 15-16) पुणे दौऱ्यावर आहेत. यातच राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य नेते छगन भुजबळ यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शरद पवार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित माझ्यासमोर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर तब्बल 40 ते 45 मिनिटे चर्चा झाली होती, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, "अजितदादा असताना, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा गांभीर्याने सुरू होती. माझ्यावरील शस्त्रक्रियेनंतर अजितदादा भेटायला आले होते. जयंत पाटील देखील होते. यावेळी चर्चेदरम्यान, दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे, अशी भूमिका मांडली होती. अजितदादा चांगले नेतृत्व करत आहेत."

या चर्चेदरम्यान, जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तुम्ही एनडीएसोबत आहात, याकडे लक्ष वेधले होते. हे त्यांना मान्य होईल का? यावर पक्षाचे कार्याध्यक्ष अजितदादा आहेत, तर संस्थापक शरद पवार आहेत. हे दोघे निर्णय घेतील, असे भूमिका आपण मांडल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले. यानंतर मात्र पुढे काहीच घडले नाही, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले.

Chhagan Bhujbal
Chhath Puja controversy : राज ठाकरेंच्या भूमिकेला काँग्रेसचा 'हात'; हुसेन दलवाईंचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले, 'मुंबईला बिहार बनवू देणार नाही!'

आता पुन्हा विलीनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. प्रत्येक जण वेगवेगळे मते मांडून, त्याचा वेगळाच अर्थ निघत आहे. आता यावर सांघिकपद्धतीने चर्चा व्हावी. एक प्रकारे क्रिकेटचा खेळ सुरू असल्यासारखी परिस्थिती आहे. एकत्र बसून निर्णय झाल्यास, त्याचे परिणाम चांगले होतील. आम्हाला समाज माध्यमांतून, किंवा बातम्यांच्या माध्यमातून समजते, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले.

Chhagan Bhujbal
Social Welfare Inspector Bribe : 24 लाखांचे बिल अडकवले, पैसे काढण्यासाठी 75 हजारांची मागणी; समाजकल्याण निरीक्षक ACBच्या जाळ्यात!

विलीनीकरणाच्या निर्णय आमच्या पक्षाच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेतील. पण ते सर्वांना विचारून, सर्वांचे मत लक्षात घेऊन, सांघिक पद्धतीने घेतली, अशी अपेक्षा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. सुनेत्रा पवार हा सर्व निर्णय सर्वांना विश्वासातच घेऊन घेतील आणि तो योग्य देखील ठरले, असेही भुजबळ यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.