Sharad Pawar  Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar unity call : सगळं विसरून एक व्हावं लागेल; हीच ती वेळ; सत्याच्या मोर्चातून पवारांनी उचलला लोकशाही टिकवण्याचा विडा

Save Democracy India News : निवडणूक व्यवस्थेत सत्तेचा गैरवापर होत आहे. राजकीय मतभेद विसरुन आपल्याला एक व्हावे लागेल, आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : महाविकास आघाडी आणि मनसेने निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात आलेल्या सत्याचा मोर्चात विरोधी पक्षातील सर्वच नेते एकत्र आले होते. त्यांनी एकत्र येत विरोधकांची मोठी एकजूट या मोर्चाच्या निमित्ताने दाखवून दिली. त्यासोबतच मतदार यादीतील दुबार मतदारांचा आकडाच यावेळी राज ठाकरेनी सांगितला. त्याचवेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निवडणूक व्यवस्थेत सत्तेचा गैरवापर होत आहे. राजकीय मतभेद विसरुन आपल्याला एक व्हावे लागेल, आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ असल्याचे सांगितले.

तुम्ही सर्वांनी जबरदस्त ताकद दाखवली, लोकशाही, संविधानाने दिलेला अधिका जतन करण्याची ही वेळ आहे. आजच्या एकजुटीने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आठवली. लोकशाहीत संविधानेन जो अधिकार दिला आहे, त्याच रक्षण करण्याची आज वेळ आली आहे. त्यामुळे येत्या काळात सगळं विसरून आम्हाला एक व्हावे लागेल, असे आवाहन शरद पवार (Sharad Pawar) यांनी या मोर्चाप्रसंगी केले.

निवडणूक आयोगाने हे सर्व सिद्ध करून देण्याचे आम्हाला आव्हान केल होते. ज्यांनी सिद्ध केले त्यांच्यावर गुन्हा दाखल केला का असा सवाल यावेळी शरद पवार यांनी उपस्थित केला. आजचा मोर्चा मला जुन्या गोष्टी आठवण करून देतो. मला आठवतंय 1978-89 या काळात महाविद्यालयात शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात असाच मोर्चा निघाला होता. काळा घोडा आणि त्याचा परिसर तिथे मोर्चे एक प्रकारचा विचार समन्वय दाखवणारे मोर्चे होते. तुम्ही सर्वांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली. त्यातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती, त्याची आठवण होते, असेही ते म्हणाले.

आमचे पक्ष वेगळे आहेत. विचारधारा वेगळी आहे. कधी मतभेद असतात. पण देशातील संसदीय लोकशाही टिकवायची असेल आणि मतांचा अधिकार टिकवायचा असेल तर तुम्हाला मला एक व्हावे लागेल. व्यासपीठावरील नेत्यांच्या वतीने आम्ही हा निकाल घेतला. मतचोरी थांबवू आणि लोकशाही कशी टिकेल याची खबरदारी घेऊ, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडी आणि मनसेने मुंबईत आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढला. या मोर्च्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह मनसे आणि महाविकास आघाडीमधील अनेक नेते सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT