Jayant Patil
Jayant Patil sarkarnama

NCP SP : जयंत पाटलांनी पहिल्या उमेदवाराची घोषणा केली : महाविकास आघाडी बाजूला ठेवून घरच्याच मैदानातून केली सुरुवात

Maha Vikas Aghadi News : माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीलाच विचारात न घेता नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. पाटील यांनी या ठिकाणचा उमेदवार जाहीर करीत आघाडी घेतली आहे.
Published on

Sangali News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असे सांगितले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीलाच विचारात न घेता नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. पाटील यांनी या ठिकाणचा उमेदवार जाहीर करीत आघाडी घेतली आहे.

पाटील यांनी त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच ईश्वरपूर (इस्लामपूर) नगरपालिकेचा उमेदवार जाहीर केला आहे. माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील, अशी घोषणा आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली. त्यामुळे आता आगामी काळात होत असलेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jayant Patil
BJP office land transfer dispute : भाजप प्रदेश कार्यालयाच्या जागेचा वाद, हस्तांतरणात नियम अन् अटीचा भंग; रोहित पवारांची चौकशी मागणी

आगामी नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीला शहरातील बूथ प्रमुख आणि पहिल्या फळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत आमदार पाटील यांनी वरिष्ठ पातळीवरून मलगुंडे यांच्या नावाला उमेदवार म्हणून पसंती मिळाल्याचे जाहीर करत पत्र वाचून दाखवले. यावेळी भाजपवर निशाणा सातत्याने या निवडणुकीत भाजपने महायुती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवून दाखवावी, असे खुले आव्हान त्यांनी दिले आहे.

Jayant Patil
BJP Politics : पोस्टरवर आमचा फोटो नाही म्हणत भाजप पदाधिकाऱ्यांची थेट चंद्रकांतदादांकडे तक्रार, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

आमदार पाटील म्हणाले, ‘‘मलगुंडे माजी नगराध्यक्ष आहेत. मितभाषी, अजातशत्रू अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. सर्वांचा त्यांना एकमुखी पाठिंबा आहे. नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेऊ. शिवाय, महाविकास आघाडीचे सर्व घटकपक्ष शिवसेना (Shivsena) व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करू', असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

Jayant Patil
BMC Election 2025 : मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरे भाकरी फिरवणार, नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी 'या' नगरसेवकांचा पत्ता कट करणार

महायुतीचा उमेदवार ठरेना!

जयंत पाटील विरोधकांनीही दिवाळीचा मुहूर्त साधत एकदिलाने लढण्याची घोषणा केली. मात्र नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण, याबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती. सोमवारी (ता. २७) मुंबईत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथील जयंत पाटील विरोधकांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत घटक पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावर प्रदेश पातळीवरून महायुतीमधील उमेदवार याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे कार्यकर्त्यांना सांगितला आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

Jayant Patil
BMC निवडणुकीपूर्वीच भाजप-शिंदेंच्या शिवसेनेत 50 जागांवरून आरपारची लढाई; सत्तेसाठी रस्सीखेच सुरू!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com