Sharad Pawar  Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar : 'दोघे भेटले, 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली...', शरद पवारांचा गोप्यस्फोट

Sharad Pawar Assembly elections Rahul Gandhi : शरद पवारांनी नागपूरात गौप्यस्फोट करताना म्हटले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी दोघा जणांनी माझी भेट घेत 160 जागा जिंकूण देण्याची गॅरंटी दिली होती.

Roshan More

Sharad Pawar News: निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी तसेच मतदार याद्यांमधील घोळाविषयी राहुल गांधी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. खोटे मतदार दाखवून निवडणुकीचे निकाल बदलले जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. आता शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दोघे व्यक्ती आपल्याला भेटले होते. तसेच 160 जागा जिंकून देण्याची त्यांनी गॅरंटी त्यांनी दिली होती, असा गौप्यस्फोट केला आहे.

शरद पवार म्हणाले की, 'दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मला काही लोक भेटायला आले. दोघे होते. त्यांची नावे, पत्ते आत्ता माझ्याकडे नाहीत. त्यांनी आम्हाला सांगितले की, महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो.'

पुढे बोलताना पवार यांनी सांगितले की, 'मला आश्चर्य वाटलं. जे जे गॅरंटीच सांगितलं. निवडणूक आयोग संस्थेबद्दल मला यत्किंचितही शंका नव्हती. राहुल गांधींची आणि त्या लोकांची मी भेट मी घालून दिली. त्या लोकांना त्यांचे म्हणणं राहुल गांधींच्या समोर म्हटलं. राहुल गांधी आणि माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये असं झालं. आपण लोकांमध्ये जाऊ ते जो निर्णय देतील तो मान्य करू.'

हास्यास्पद दावे

भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांनी केलेल्या दाव्याबाबत म्हटले आहे की, मला असे वाटतं की हे बालीश आणि हास्यास्पद दावे आहेत. पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याने असे बालबोध दावे करणं हे खरचं आश्चर्यकारक आहेत. आपल्याकडे दोन माणसं आली होती तर आपण इलेक्शन कमिशनकडे, पोलिसांमध्ये तक्रार का केली नाही. उलट आपण त्या माणसांना घेऊन आपण राहुल गांधींकडे गेला याचा अर्थ या गोष्टींना आपला समर्थन देण्याचा विचार होता का? असा सवाल देखील दरेकर यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT