Manmad APMC : भुजबळांचा जुना शिलेदार भाजपमध्ये आल्यावरही सुहास कांदेंना नडला; अल्पमत असूनही झुंजवलं

Manmad Market Committee Politics : गेले सहा महिने मनमाड बाजार समितीच्या सभापती पदावरून राजकीय संघर्ष सुरू आहे. आमदार सुहास कांदे यांच्या गटाकडे संख्या बळ असूनही तांत्रिक मुद्द्यांवर सभापती दीपक गोगड यांनी त्यांना झुंजवत ठेवले आहे.
 Manmad Market Committee
Deepak Gogade during the Manmad Market Committee meeting, where he successfully defended his chairmanship against Suhas Kande group’s no-confidence attempt.Sarkarnama
Published on
Updated on

Manmad APMC News : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दीपक गोगाड यांच्याविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या गटाच्या 11 संचालकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. मात्र दीपक गोगाड यांनी शांत डोक्याने रचलेल्या डावपेचाने एका संचालकाला मतदानात भाग घेता आला नाही. परिणामी 12 संचालकांआभावी हा अविश्वास ठराव फेटाळण्यात आला.

गेले 6 महिन्यांपासून मनमाड बाजार समितीच्या सभापती पदावरून राजकीय संघर्ष सुरू आहे. सभापती दीपक गोगड मोठ्या प्रमाणात वादात सापडले आहे. प्रारंभी कर्मचाऱ्यांनी वेतन मिळत नसल्याने संप करून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर बहुतांशी संचालक सुहास कांदे यांच्या गटात दाखल झाले होते. तेव्हापासून कांदे विरुद्ध गोगाड यांच्यात एकमेकांवर राजकीय कुरघोडी सुरु होती.

या कुरघोडीच्या राजकारणात गोगाड यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी कांदे गटाला 12 संचालकांची आवश्यकता होती. प्रत्यक्षात हे गणित जुळविण्यात आमदार कांदे यांना यश आले नाही. कांदेंच्या शिफारशीनंतर 18 जुलैला रमेश कराड यांची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संचालक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यामुळे कांदे गटाकडे 12 संचालकांचे संख्याबळ झाले. त्यानंतर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता.

मात्र, नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेल्या दीपक गोगडे यांनी उच्च न्यायालयाच्या माध्यमातून सूत्र फिरवली. न्यायालयातून कराड यांची नियुक्ती रद्द झाली. परिणामी पुन्हा एकदा तांत्रिक मुद्द्यांवर 12 संख्याबळ गाठण्यात आमदार कांदे समर्थक कमी पडले. शुक्रवारी मनमाड बाजार समितीच्या सभागृहात दीपक गोगडे यांच्यावरील अविश्वास ठरावावर चर्चा झाली. पिठासीन अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. सभापती गोगड यांनी उच्च न्यायालयाचा आदेश सादर केला.

गोगाड यांनी अगदी ऐनवेळी उच्च न्यायालयाचा आदेश सादर केला. कराड यांना मतदानात भाग घेता आला नाही. अल्पमतात असूनही गोगड यांनी सभापती पद आपल्याकडे राखले. माजी आमदार संजय पवार, किशोर लहाने, दशरथ लहिरे, विठ्ठल आहेर, कैलास भाबड, सुभाष उगले, आप्पा कुंडगर, संगीता कराड, चंद्रकला डघळे, गंगाधर बिडकर आणि मधुकर उगले या 11 संचालकांनी सभापती गोगड यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले.

 Manmad Market Committee
Eknath Khadse : चाकणकरांनी जावयाच्या मोबाईमधील डेटा बाहेर काढताच खडसे संतापले, म्हणाले, "सोयीनुसार महिलांची बदनामी..."

पण 12 संचालकांआभावी हा अविश्वास ठराव फेटाळण्यात आला. यामुळे सभापतीपद गोगड यांच्याकडे कायम राहिले आहे. मात्र काल अविश्वास ठरावाच्या कामकाजाच्या वेळी स्वतः गोगाड आणि गणेश धात्रक हे संचालक उपस्थित होते. त्यामुळे आमदार कांदे यांच्याकडे तालुक्याची सर्व सत्ता असली तरी या दोघा संचालकांनी त्यांना तांत्रिक आणि नियमांच्या आधारे झुंजवले.

 Manmad Market Committee
Modi China visit : मोदींचा चीन दौरा अन् भारत-अमेरिका वाद! चीनने अचूक टायमिंग साधलं, पंतप्रधान मोदींसाठी थेट रेड कार्पेट अंथरलं!

आगामी काळात हा राजकीय वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे. बाजार समितीत बहुमत आमदार कांदे समर्थक संचालकांचे तर सभापतीपदी दीपक गोगड हे आहेत. दीपक गोगाड यांनी देखील नुकतेच माजी खासदार समीर भुजबळ यांची साथ सोडत राजकीय सोय म्हणून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे अविश्वास ठरावाची प्रक्रिया आणि आगामी राजकारण दोन्हीही अतिशय रंजक होण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com