Sharad Pawar  Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar News : शरद पवारांच्या जवळच्या दोन बड्या नेत्यांना फडणवीस सरकारकडून मोठं गिफ्ट?

Fadnavis Government News : राज्य सरकारने शरद पवारांच्या जवळच्या दोन बड्या नेत्यांना राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट मिळाले आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर आघाडीकडे येणाऱ्यांचा ओढा वाढला होता. मात्र, त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर वारे उलटे फिरले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीसाठी महाविकास आघाडीमध्ये गेलेल्या अनेक नेतेमंडळी पुन्हा महायुतीमध्ये परतण्यास उत्सुक आहेत.

महाविकास आघाडीचे अनेक नेते महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे, मात्र जयंत पाटील यांनी ही चर्चा फेटाळून लावली. त्यातच राज्य सरकारने शरद पवारांच्या जवळच्या दोन बड्या नेत्यांना राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट मिळाले आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन दिवसापूर्वी मध्यरात्री भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. या भेटीवरून चर्चा रंगली असतानाच या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये असे जयंत पाटील यांनी स्पष्ट करीत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. सांगली जिल्ह्यातले महसूल संबंधित काही प्रश्न होते. त्या संदर्भात भेट घेतल्याचे स्पष्ट केले. माझ्यासोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माझा स्टाफ देखील होता. या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे स्पष्ट केले.

पीएंच्या पगाराचा खर्च देणार

या दोन बड्या नेत्याच्या भेटीला काही दिवस उलटले नाहीत तोपर्यंतच राजकीय हालचालींना वेग आला आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नेते उत्तम जानकर यांना सरकारकडून पीए देण्यात आले आहेत. या पीएंच्या पगाराचा खर्च देखील सरकारी तिजोरीमधून होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

काही दिवसापूर्वीच शरद पवार गटाचे नेते व आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर सरकारविरोधात मोठे आंदोलन उभारले होते. या आंदोलनामुळे सरकारची डोकेदुखी वाढली असताना देखील त्यांना सरकारी पीए देण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. उत्तम जानकर यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करत यापूर्वीच आंदोलनाचा इशारा दिला होता. निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे भाजपकडून या दोन्ही नेत्यांना मोठे गिफ्ट देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT