Shivsena News : पुण्यात एकनाथ शिंदेंनी टाकला मोठा डाव; अजितदादांसाठी डोकेदुखी ठरलेला 'तो' आमदार लागला शिवसेनेच्या गळाला

Eknath Shinde Pune Politics : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर आघाडीकडे येणाऱ्यांचा ओढा वाढला होता. मात्र, त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर वारे उलटे फिरले आहे.
Ajit Pawar  Eknath Shinde
Ajit Pawar Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर आघाडीकडे येणाऱ्यांचा ओढा वाढला होता. मात्र, त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. 288 पैकी महायुतीच्या राज्यात तब्बल 232 जागा निवडून आल्या. तर महाविकास आघाडीला 50 जागाच मिळाल्या, त्यानंतर वारे उलटे फिरले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीसाठी महाविकास आघाडीमध्ये गेलेल्या अनेक नेतेमंडळी पुन्हा महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत. त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राज्यात ऑपरेशन टायगर राबवले जात असताना आता पुण्यात त्यांनी मोठा डाव टाकला आहे. विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डोकेदुखी ठरलेला आमदार आता शिवसेनेच्या गळाला लागले असून 28 फेब्रुवारीला शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसल्याने अनेक नेते महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत. विशेषतः गेल्या काही दिवसात शिवसेना आणि भाजपमध्ये नेत्यांचे जोरदार इनकमिंग होताना दिसत आहे. याचा सर्वात मोठा धक्का हा शिवसेना ठाकरे गटाला बसत आहे. गेल्या काही दिवसापासून अनेक नेत्यांनी भाजप व शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Ajit Pawar  Eknath Shinde
Eknath Shinde ShivSena : भलतेच नखरे! 'त्या' माजी आमदाराची पक्षात येण्यासाठी शिंदेंकडे भरमसाठ डिमांड

पुण्यात ही शिंदे शिवसेनेत मोठा नेता गळाला लागला आहे. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शरद सोनवणे हे जुन्नरचे अपक्ष आमदार आहेत. नारायणगाव येथे 28 फेब्रुवारीला शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळावा होत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये सोनवणे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Ajit Pawar  Eknath Shinde
Mahayuti News: आधी शिंदे आता अजितदादा मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी; 'फिक्सर'मुळे वातावरण तापले!

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जुन्नर विधानसभा निवडणूक सोनवणे यांनी अपक्ष म्हणून लढवली होती. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अतुल बेनके यांच्या विरोधात ही निवडणूक लढवली होती. सोनवणे यांच्या या निर्णयामुळे जुन्नर मतदारसंघात अजित पवार आणि राष्ट्रवादीची डोकेदुखी झाली होती. या चुरशीच्या लढतीमध्ये शरद सोनवणे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल बेनके यांचा पराभव केला.

दरम्यान, सोनवणे यांनी महायुतीत असताना राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार अतुल बेनके यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार आहेत.

Ajit Pawar  Eknath Shinde
kirit Somaiya News : किरीट सोमय्या यांचा दुसऱ्यांदा सिल्लोडचा दौरा, चारशेवर रोहिंग्यांची यादी देत गुन्हा दाखल करण्याची मागणी!

शरद सोनवने हे आढळराव पाटलांची जागा घेणार का ?

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी उमेदवारी मिळवण्यासाठी माजी खासदार शिवाजी आढळराव-पाटलांनी शिवसेनासोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेचे तिकीट देण्यात आले होते. मात्र, त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे येत्या काळात आमदार शरद सोनवने हे आढळराव पाटलांची जागा घेणार का ? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar  Eknath Shinde
Ravikant Tupkar : तुपकरांची शेतकरी संघटना आता स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रस्थापितांना घाम फोडणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com