Mumbai News : शरद पवार हसले की, काही तरी होते, हा राजकीय जाणकारांचा अनुभव आहे. तसेच काहीसे शरद पवार आज पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर हसले. अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला शरद पवार यांनी संयमाने सुनावले. परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली म्हणून प्रत्युत्तर दिले. यावर आता शरद पवार हसले असून या दोघांच्या टीकेचा विषय एका वाक्यात टोलावून लावला आहे.
शरद पवार यांनी अमित शाह (Amit Shah) यांच्यावर टिका करणे म्हणजे, 'सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे', असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. यावर शरद पवार यांना पत्रकार परिषदेत विचारल्यावर, शरद पवार सुरवातीला हसले अन् म्हणाले, 'तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितला आहे', असे एका वाक्यात दोन जणांना टोला लगावला.
भाजपचा पुण्यात अधिवेशन झाले. भाजप (BJP) नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टिका केली. "भ्रष्टाचाराचे सरदार म्हणून शरद पवार यांच्यावर टिका केली. भ्रष्टाचाराला संस्थात्मक स्वरुप दिले. दहा वर्षात शरद पवार यांनी काय केले, याचा हिशोब द्यावा", असे अमित शाह यांनी म्हटले होते.
अमित शाह यांच्या या टिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषदेत अमित शाह यांच्या टिकेला संयमाने सुनावले. मला भ्रष्टाचाराचे सरदार म्हणणाऱ्याला गुजरातमधून तडीपार केले होते. तडीपार व्यक्ती देशाचा गृहमंत्री झाला आहे, त्यामुळे आपला देश कुठल्या मार्गावर चाललाय हे सांगायची गरज नाही, असे शरद पवार यांनी सुनावले होते.
शरद पवार यांचे अमित शाह यांना सुनावणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या झोंबले. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांनी अमित शाह यांच्यावर बोलणे म्हणजे, सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे, अशी टिका केली. यावर शरद पवार यांनी 'हा दिवा महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितला होता', असे टोला लगावून हा विषय एका वाक्यात संपवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.