"मी शरद पवार यांचं बोट धरून राजकारण आलो," असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. पंतप्रधान मोदी यांच्या 'या' विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेबांनी चांगलीच फिरकी घेतली आहे.
"मला माझ्या बोटावर विश्वास आहे. माझे बोट कोणाच्याही हातात देणार नाही," अशी टोलेबाजी शरद पवारसाहेबांनी ( Sharad Pawar ) केली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे एका मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
मेळाव्यात एका नेत्यानं शरद पवारसाहेबांचं बोट पकडून राजकारणात आलो आहोत, असं विधान केलं होतं. यानंतर पवारसाहेबांनी पंतप्रधान मोदींच्या विधानाचा दाखला देत मिश्किल वक्तव्य केलं. पवारसाहेबांच्या विधानानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.
काय म्हणाले पवारसाहेब?
"तौफीकजी यांनी म्हटलं, 'आम्ही पवारसाहेबांचं बोट धरून राजकारणात आलो आहे.' हे वक्तव्य मी खरे मानत नाही. कारण, एकदा पंतप्रधान मोदींनी ( Narendra Modi ) एकदा म्हटलेलं, 'शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो आहे.' तेव्हापासून माझ्या बोटांवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी कुणाच्याही हातात बोट देणार नाही," असं पवारसाहेबांनी म्हटलं.
अमित शहांना प्रत्युत्तर...
'शरद पवार देशाच्या राजकारणातील सर्वांत जास्त भ्रष्टाचारी आहेत. ते भ्रष्टाचाराचे सरदार आहेत,' असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला होता. यालाही शरद पवारसाहेबांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवार म्हणाले, "देशातील भ्रष्टाचाऱ्यांचा सुभेदार मी आहे, असं अमित शाह यांनी म्हटलं. पण, गृहमंत्री गुजरातमध्ये असताना कायद्याचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांना सर्वोच्च न्यायालयानं तिथून तडीपार केलं होतं. ज्यांना सर्वोच्च न्यायालयानं तडीपार केलं होतं. ते आज देशाचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे आपला देश कुठल्या मार्गावर चालला आहे, याचा विचार करण्याची गरज आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.