Baramati News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून 6 पेक्षा अधिकवेळा कार्यरत राहिलेले अजित पवार यांचे मंगळवारी (ता.28) अपघाती निधन झाले. बारामतीतील चार सभांसाठी मुंबईहून विमानाने गेलेल्या अजित पवार यांचं प्लेन बारामतीजवळ एका शेतात क्रॅश झालं आणि मोठा स्फोट होऊन आगीच्या ज्वाळा उसळल्या. खाली पडल्यावरही विमानात अनेक स्फोट होते. याच अपघातामध्ये अजित पवार (वय 66) यांच्यासह त्यांचे अंगरक्षक,विमानाचे दोन पायलट आणि फ्लाइट अटेंडंट अशा 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांच्या निधनानंतर एक्सवर ही पोस्ट केली होती. स्वत: नरेंद्र मोदी हे शरद पवार यांच्याशी बोलले. सांत्वन करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन केला होता. पण आता अजित पवारांच्या विमान अपघातानंतर काही राजकीय नेत्यांकडून या अपघाताची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याचदरम्यान, आता शरद पवारांनी संवाद साधताना हा निव्वळ अपघात असून राजकारण नाही,असल्याचं स्पष्ट केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बारामतीत विमानअपघातत निधन झाले.पवार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बारामतीसह महाराष्ट्रातील नागरिक शोक व्यक्त करत आहेत. शरद पवार यांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दिल्लीहून रवाना झाले होते. त्यांच्यासोबत प्रतिभा पवार या देखील होत्या. दुपारी दीडच्या सुमारास हॅलिकॉप्टरने बारामतीत पोहोचले. हॅलिकॉप्टरमधून उतरताच त्यांनी नेमका अपघात कसा घडला,याची माहिती घेतली.त्यानंतर ते रुग्णालयाकडे रवाना झाले.
शरद पवार म्हणाले,अजित पवार यांचा अपघाती मृ्त्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्वान आणि निर्णय घेण्याची शक्ती आहे,अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालं,ते भरून निघणारं नाही. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. आज काही माध्यमांमध्ये या अपघाताविषयी साशंकता व्यक्त करण्यात आली. या अपघाताच्या मुळाशी राजकारण आहे, अशी भूमिकाही कलकत्यावरून मांडली गेली.
परंतू, याच्यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे. याच्या यातना महाराष्ट्राला,आम्हा सर्वांना आहेत. कृपाकरुन इथं राजकारण आणू नये. एवढंच मला सांगायचंय, असंही शरद पवारांनी यावेळी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.