

Baramati News: बारामती विमानतळाजवळ बुधवारी(ता.28) सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं खासगी प्रायव्हेट चार्टर विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह मुख्य पायलट सुमीत कपूर,पायलट शांभवी पाठक आणि चार्टर स्टाफ पिंकी माळी यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. पण पिंकी माळी यांनी अपघाताच्या आदल्यादिवशीच आपण बारामतीला चाललो असल्याचं कुटुंबाला सांगितलं होतं.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रायव्हेट चार्टरमध्ये फ्लाईट अटेंडंट म्हणून पिंकी माळी म्हणून कार्यरत होत्या.या दुर्घटनेत वरळीतील रहिवासी असलेली आणि फ्लाइट अटेंडंट म्हणून कार्यरत असलेल्या पिंकी माळीचा मृत्यू झाला. ही अपघाताची घटना समजल्यानंतर,त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. पिंकी यांचे वडील शिवकुमार माळी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आहेत.
पिंकीचे वडील शिवकुमार माळी यांनी आपली माध्यमांशी बोलताना आपली दु:खद प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, या घटनेच्या आदल्या रात्री त्यांना पिंकीचा फोन आला होता आणि तिने बारामतीला जाणार असल्याची माहिती दिली होती. तसेच त्यांनी अजित पवार स्वत:आमच्याशी बोलले होते,असं कुटुंबियांचं सांगितलं होतं.
पिंकी माळी यांचा मृतदेह मुंबईत आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती दिली जात आहे. महाराष्ट्र सरकारकडून याबाबत माळी कुटुंबाला आश्वासन देण्यात आलं आहे.अजित पवार यांच्या चार्टर फ्लाइटमध्ये फ्लाइट स्टाफ म्हणून कार्यरत असण्याची पिंकी माळी यांची ही तिसरी वेळ असल्याची माहिती आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी VSR Aviation कंपनीच्या Learjet 45XR विमानाने मुंबईहून बारामतीला जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी तिथे चार सभा होणार होत्या. जवळपास 8.45 च्या सुमारास अजित पवारांचं विमान लँडिंगच्या प्रयत्नात असताना कोसळलं.
बारामती विमानतळाजवळ अजित पवारांच्या विमानानं लँडिंग दरम्यान रनवे 11 जवळ आपलं नियंत्रण गमावलं. लँडिंगआधी जमिनीवर येऊन धडकलं.त्यामुळे विमानात मोठा स्फोट होऊन आग लागली. घटनास्थळी उपस्थित अधिकारी आणि स्थानिक लोकांनी सांगितलं की, अपघातानंतर विमानाच्या स्फोटाचे अनेक आवाज झाला.धडकल्यानंतर विमानाला आगीच्या ज्वाळांनी वेढलं होतं.
पिंकीने तिच्या वडिलांना फोन करत पप्पा,मी आज अजितदादा पवारांसोबत बारामतीला जाणार आहे आणि तिथे त्यांना सोडून मी नांदेडला जाणार आहे. त्यानंतर मग हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर मी तुम्हाला फोन करते असंही पिंकी म्हणाल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं. मात्र,सकाळपर्यंत सगळं काही बदललं. बारामतीजवळ एक विमान कोसळलं आणि शिवकुमार माळी यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
पिंकी माळी या गेल्या आठ वर्षांपासून फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करत होत्या.गेल्या 5 वर्षांपासून त्या व्हीआयपी चार्टर्ड फ्लाइट्समध्ये कार्यरत होती. पिंकी यांनी अजित पवारांसोबत चारवेळा विमानाने प्रवास केला होता. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,प्रल्हाद मोदी (पंतप्रधान मोदींचे भाऊ) आणि अगदी राष्ट्रपतींसोबतही चार्टर्ड विमानांत ड्युटी केली.
पिंकी यांचे वडील म्हणाले,तिने यापूर्वी कधीही कोणत्याच फ्लाइटमध्ये टेक्निकल समस्या किंवा सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली नाही.ती नुकतीच मालदीवच्या फ्लाइटवरून परतल्याची माहिती दिली.तिचे काम नेहमीच प्रोफेशनल होतं.कुटुंबातील काही सदस्य सध्या घटनास्थळी उपस्थित आहेत.
शिवकुमार माळी यांनी आम्ही झोपडपट्टीत राहणारे मध्यमवर्गीय लोक आहोत.माझ्या मुलीने तिचं स्वप्न पूर्ण करत एवढा मोठा टप्पा गाठला याचा मला खूप अभिमान वाटतो.पण ज्या पद्धतीने ही दुर्घटना घडली त्यामुळे आमचे संपूर्ण जग उद्ध्वस्त झाल्याची हादरवून टाकणारी माहिती माळी यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.