New Dehli news : दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार अधिवेशनापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत. त्यांच्या प्रवेशाने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यातच या खासदारांनी पीएम मोदी यांची भेट घेतल्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी विकास कामाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर बुधवारी सायंकाळी शरद पवार यांनी त्याच्या पक्षाच्या खासदारांची महत्त्वाची बैठक घेतली.
दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. ही बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीचे नेमके कारण समजू शकलेले नव्हते. परंतु बैठक पार पडल्यानंतर खासदारांनी बैठक का झाली याबाबत माहिती दिली. या बैठकीस शरद पवार यांच्या पक्षाचे सर्व खासदार हजर होते.
दोन दिवसापूर्वी शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली होती. ही बैठक तेव्हा चांगलाच चर्चेचा मुद्दा ठरली होती. पीएम मोदी आणि राष्ट्रवादींच्या खासदारांची भेट झाल्यानंतर आता याच खासदारांची शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या बिथकीत काय ठरले याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
बैठकीचे नेमके कारण आले समोर
या खासदाराची बैठक संपल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मतदारसंघांतील प्रलंबित असलेल्या विकास कामाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीत अन्य कोणताही विषय नव्हता, असे कोल्हे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता नेमके भविष्यात काय घडामोडी घडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.