Sharad Pawar  sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar Video : मराठा -ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे मोठं वक्तव्य, म्हणाले, 'वाटेल ती किंमत मोजू पण...'

Sharad Pawar Maratha-OBC Conflic : दादासाहेब गायकवाड जन्मभूमी स्मारक उद्घाटन सोहळ्यात शरद पवारांनी सामाजिक ऐक्याचे आवाहन करत त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

Roshan More

Sharad Pawar News : सरकारने हैदराबाद गॅझेटीअर लागू करण्याच्या निर्णयानंतर राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचे चित्र आहे. ओबीसी नेते सरकारच्या निर्णयाविरोधात कोर्टात गेले आहेत. सभा, यात्रा काढत सरकराच्या या निर्णयाला आव्हान देत आहेत. तर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील आमचा हक्का हिसकावून घ्याल तर आम्ही देखील संघर्ष करू, असा इशारा देत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी नाशिकमध्ये मोठं वक्तव्य केलं.

नाशिकमधील आंबेदिंडोरी येथे दादासाहेब गायकवाड जन्मभूमी स्मारक उद्घाटन सोहळ्यात बोलताना शरद पवार म्हणाले, 'दादासाहेब एक आगळ वेगळं व्यक्तिमत्व होतं. त्यांचं उभं आयुष्य उपेक्षितांसाठी गेलं. सार्वजनिक जीवनामध्ये सामाजिक ऐक्य कसं येईल याबद्दलची खबरदारी त्यांनी अखंडपणाने घेतली. आज महाराष्ट्राचं चित्र थोडं वेगळं झालेलं आहे. इथला समतेचा विचार क्षीण होतोय की काय असं दिसतंय.'

पुढे बोलताना ते म्हणाले, 'इथल्या सामाजिक ऐक्याची वीण उसवते की काय असं चित्र दिसतंय. माझ्या मते हे एक प्रकारचं आव्हान आहे. काय वाटेल ती किंमत द्यायची असेल ती किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंघ कसा राहील. महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र कसे ठेवता येईल आणि महाराष्ट्राचा लौकिक जो चव्हाण साहेबांनी, जो दादासाहेब गायकवाड यांनी आणि त्यासारख्या अनेकांनी जो घालून दिलेला होता तो पुढे नेण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याच्यासाठी तुमची माझी सगळ्यांची सिद्धता असली पाहिजे.'

बाबासाहेबांमुळे दादासाहेब राजकारणत

शरद पवारांनी आपल्या भाषणात दादासाहेब गायकवाड राजकारणत कसे आले याचा किस्सा सांगितला ते म्हणाले, दादासाहेब गायकवाडांनी महसूल खात्यात नोकरी धरली आणि त्यांची नियुक्ती कराचीला झाली. जी कराची आज पाकिस्तानचा भाग आहे. १९१९ साली त्यांनी कराची सोडली आणि ते इथे आले. आनंदाची गोष्ट अशी कि, एके दिवशी त्यांची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली. पहिल्याच भेटीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हेरलं की हे गृहस्थ उभं आयुष्य समाजाची सेवा करण्यासाठी आपल्याला साथ देतील.त्यामुळे त्या दोघांमध्ये सुसंवाद प्रस्थापित झाला. दादासाहेब गायकवाड यांना बाबासाहेबांनी सुचवलं कि, आता नोकरी वगैरे काही नाही आता समाजासाठी काम करायचं. राजकीय कारकीर्द सुरू करायची आणि १९२८ साली त्या काळामध्ये लोकल बोर्ड असत. आजची जशी जिल्हा परिषद तसे ते लोकल बोर्ड. त्या लोकल बोर्डात दादासाहेब निवडून आले. पुढे ते मुंबई प्रांताचे आमदार झाले, खासदार झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT