NCP News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदार फुटले आहेत. आता शरद पवारांच्या पक्षातील खासदार देखील धोक्यात असल्याची चर्चा आहे. माजी मंत्री,आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवारांच्यासोबत असलेले पाच खासदार हे सुनेत्रा पवारांच्यासोबत येऊ शकताता, असा दावा केला आहे.
आत्राम म्हणाले की,'आम्ही ऑपरेशन करणार नाही. तुतारीवालेच ऑपरेशन करतील, माझा अंदाज आहे की पाच खासदार येऊ शकतात. त्यांना पुढे निवडून यायचे असतील तर कामं करणे गरजेचे आहे. त्यांना विकासासोबत राहणं गरजेचं आहे.'
पुढे बोलताना ते म्हणाले 'सुनेत्राताई यांच्या नेतृत्वात लोकांचा विश्वास वाढला आहे. आणि पक्ष मजबूत होत आहे. काही माजी खासदार देखील सुद्धा पक्षात येत आहे. माजी आमदार देखील येत आहेत. आजी खासदार आणि आजी आमदार देखील येऊ शकतात. त्याला काही मला प्राॅब्लेम दिसत नाही.'
'मुद्दा विकासाचा आहे. लोकांचं काम होणं महत्त्वाचं आहे. मला वाटतं १२ डिसेंबरपर्यंत खासदार आमच्या पक्षात येऊ शकतात.', असे देखील त्यांनी सांगितले.
शरद पवारांचे खासदार फुटण्याच्या चर्चांबाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले, बाकींच्याचे मी काही सांगू शकत नाही. मात्र, राष्ट्रवादीचे खासदार फुटणार नाहीत. शरद पवारांच्या खासदार फुटणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.