Rajya Sabha Election Secret : ...म्हणूनच उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना पाठिंबा दिला; शिंदेंच्या निकटवर्तीय खासदाराचा गौप्यस्फोट

Naresh Mhaske's claim : राज्यसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी अतिरिक्त उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे, हे समजल्यावरच शरद पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय आदित्य ठाकरे यांनी घेतला, असा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे.
Naresh Mhaske-Aaditya Thackeray-Sharad Pawar
Naresh Mhaske-Aaditya Thackeray-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 09 March : आदित्य ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा राज्यसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा देणार नव्हते. त्यांचा त्याबाबतचा निर्णय आदल्या रात्रीच झाला होता. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिरिक्त एक उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे, हे जेव्हा ठाकरेंना कळाले, तेव्हा त्यांनी घाबरून पवार यांना पाठिंबा दिला, असा गौप्यस्फोट खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे.

खासदार म्हस्के म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा सन्मान राखणं, हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. खासदार सुप्रिया सुळे आदल्या दिवशी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटायला गेल्या होत्या. त्या बाहेर पडत नाहीत, तोच आदित्य ठाकरेंचं ट्विट आलं की ‘आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही आमचा उमेदवार उभा करणार.’

याचा अर्थ असा की, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे शरद पवार यांना पाठिंबा देणार नव्हते. त्यांचा हा आदल्या दिवशीच्या रात्रीचा हा निर्णय होता. पण, एकनाथ शिंदे हे राज्यसभेसाठी आठवा उमेदवार उभा करणार आहेत आणि ते त्यांच्या मतांवर ठाम आहेत, हे जेव्हा ठाकरेंना कळालं, त्या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शरद पवार यांना पाठिंबा जाहीर केला, असा दावाही नरेश म्हस्के यांनी केला.

नरेश म्हस्के (Naresh Mhaske) म्हणाले, ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार उभा केला असता तर त्यांचा उमेदवार पडला असता, ही त्यांना शंंभर टक्के ग्यारंटी होती, म्हणून त्यांनी पवारसाहेबांना पाठिंबा देण्याचे नाटक केले. नाही तर त्यांचा शरद पवार यांच्या उमेदवारीला विरोध होता. पण, शरद पवार हे राज्यातील नव्हे तर देशातील सर्वोच्च नेते आहेत. त्यांचा आदर राखणं, हे आवश्यकख आहे. त्यांचा आदर राखणं, हे एकनाथ शिंदे यांनी काम केलेले आहे.

Naresh Mhaske-Aaditya Thackeray-Sharad Pawar
Daund Sabhapati : राष्ट्रवादीची सत्ता उलथवून दौंडच्या इतिहासात प्रथमच भाजपचा सभापती; राहुल कुल गटाची सरशी

एकनाथ शिंदेंना एक फोन करा

नरेश म्हस्के म्हणाले, कुणी घर देता का घर याप्रमाणे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना कोणी आमदारकी देता का आमदारकी, अशी विनवणी महाविकास आघाडीतील पक्षांकडे करत आहेत. घटक पक्षांनी आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितले आहे. आमची अतिरिक्त मतं त्यांना पाहिजे असतील तर त्यांनी एकनाथ शिंदे यांना एक फोन करावा. विनंती करा, असं आम्ही म्हणणार नाही, तर किमान संवाद साधा, असे आवाह खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे.

Naresh Mhaske-Aaditya Thackeray-Sharad Pawar
Auto Rickshaw Permit : राज्यातील नवीन रिक्षा परवाना वाटपाला स्थगिती : मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा; संघटनांकडून स्वागत

आमचे साहेब मोठ्या मनाचे...

राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी अतिरिक्त उमेदवार उतरवू नये, यासाठी माजी मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधला होता. त्याचपद्धतीने तुम्ही संवाद साधा. आमचे साहेब मोठ्या मनाचे आहेत. पण त्यासाठी किमान बोलायला तरी पाहिजे, असे आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com