Nationalist Congress Party merger controversy; Sharad Pawar And Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

NCP Merger Media Ban : शरद पवारांचा मोठा निर्णय, विलिनीकरणाच्या चर्चांवर ब्रेक? इतरांना मनाई करत फक्त तिघांच्या खांद्यावर दिली जबाबदारी

NCP Merger and Only Supriya Sule, Jayant Patil And Shashikant Shinde To Speak : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चेवरून सध्या संभ्रम निर्माण झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे.

Aslam Shanedivan

  1. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने विलिनीकरणाच्या चर्चांवर कडक निर्बंध घातले आहेत.

  2. सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे हेच अधिकृतपणे माध्यमांशी बोलणार आहेत.

  3. चुकीच्या वक्तव्यांमुळे संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून इतर नेत्यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे.

Mumbai News : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. यावरून राजकारण तापले आहे. दरम्यान शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर थेट भाष्य करत अजित पवार यांचीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी इच्छा होती. ती आम्ही पूर्ण करू. पण या चर्चा झाल्याच नाहीत, तशी चर्चा झाल्याचे आम्हाला माहित नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहे.

यावरून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चेत सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. असा संभ्रम निर्माण होवून चर्चेत खंड पडू नये ती भरकटू नये म्हणून शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी या प्रकरणात इतर नेत्यांना सक्त मनाई केली आहे की त्यांनी यावर माध्यमांशी बोल नये. तर काही वरिष्ठ नेतेच बोलतील. त्यांच्या या मनाई आदेशामुळे आता विलिनीकरणाच्या चर्चांवर ब्रेक लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती येथे विमान कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. त्याच्याआधी दहा दिवसांच्या आधी शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठक झाल्याचे समोर आले होते. तर ही बैठक दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात होती असे आता बोलले जात आहे. तर ही बैठक जयंत पाटील यांच्या घरी झाली होती.

मात्र हा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळला आहे. त्यांनी अशा पद्धतीने अजित पवार यांच्या मनात काही होतं. तर ते आमच्याशी बोलले असते. पण तसं आम्हाला काही सांगण्यात आलेलं नाही. आमच्याशी चर्चा ही केलेली नाही. ते आमच्या सरकारमध्ये होते. त्यामुळे ते आमच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतील. त्यामुळे असे वाटतं नसल्याचे फडणवीस यांनी म्हटलं होते.

तर तटकरे यांनी ती बैठक का? कशासाठी? आणि कधी झाली याची संपूर्ण माहिती दिली तर ती बैठक दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात नव्हती हे स्पष्ट असल्याचे म्हटले होते. ज्यानंतर जयंत पाटील यांच्यासह शशिकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा अजित पवारांना काय वाटायचं हे सांगितलं.

या सर्व घडामोडी दरम्यान शरद पवार यांनी, ज्यांना काहीच माहिती नसतं त्यांना बैठकीतील काय माहित असणार असा सवाल उपस्थित करत डाव टाकल्याचे बोलले जात आहे. अशातच आता शरद पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना आदेश काढत थेट दम भरला आहे. त्यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात पक्षातील नेत्यांना कडक सूचना देताना वरिष्ठांच्या परवानगीशिवाय भाष्य न करण्याचे आदेश दिले आहेत.

तर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे हेच अधिकृतपणे बोलतील, असे सांगितले आहे. तर माहितीअभावी चुकीची वक्तव्ये होऊन चर्चा भरकटू नये, यासाठी हा निर्णय घेतला असून प्रवक्ते आणि इतर नेत्यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आलीय.

FAQs :

1. राष्ट्रवादीने कडक सूचना का दिल्या आहेत?
विलिनीकरणावर चुकीची माहिती पसरू नये आणि चर्चा भरकटू नये म्हणून सूचना दिल्या आहेत.

2. विलिनीकरणावर कोण बोलू शकणार आहे?
सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे हेच अधिकृत प्रवक्ते असतील.

3. इतर नेत्यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई आहे का?
होय, प्रवक्ते आणि इतर नेत्यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे.

4. वरिष्ठांच्या परवानगीशिवाय बोलल्यास काय होईल?
पक्षशिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

5. हा आदेश कोणत्या पक्षाने दिला आहे?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने हा आदेश दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT