NCP Merger : राष्ट्रवादीत विलिनीकरणाच्या सर्व चर्चांना नाकारणाऱ्या तटकरेंचं सूचक विधान; म्हणाले, “कोणत्या पक्षाचं, आम्हीही अनुभवी...”

Sunil Tatkare Statement on NCP Merger : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री यांच्यानंतर आता राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरून चर्चेच गुऱ्हाळ सुरू झाले आहे.
Sunil Tatkare rejects NCP merger rumors with Sharad Pawar faction
Sunil Tatkare rejects NCP merger rumors with Sharad Pawar factionSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

  2. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये विलिनीकरणावरून मतभेद तीव्र झाले आहेत.

  3. सुनील तटकरे यांच्या सूचक विधानामुळे विलिनीकरणाच्या चर्चेला नवे वळण मिळाले आहे.

Raigad Political News: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यात जलद घडामोडी झाल्या. राज्यातील तीन दिवसांचा दु:खवटा संपताच चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी खासदार पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथविधी घेतली. यावरून राज्यात वाद सुरू झाला असतानाच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये विलिनीकरणावरून खटके उडताना दिसले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ही दादांची शेवटची इच्छा होती असे म्हणत विलिनीकरणासाठी आग्रह धरला जात आहे.

पण अशी कोणतीच चर्चा नव्हती, तशी बैठकच झाली नाही असे स्पष्टीकरण देत विलिनीकरणाच्या विरोधातील भूमिका अजित पवार गटाकडून घेतली जात आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणावर सूचक विधान केलं आहे. तटकरे यांनी, विलिनीकरणाबाबत शरद पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत मी बोलणार नाही. पण विलिनीकरण कोणत्या पक्षाचं? असे म्हटल्याने सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना जोर धरला होता.

पण अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आणि सुनेत्रा पवार यांचा शपथविधीनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान दोन्ही पक्षांकडून भूमिका मांडली जात असतानाच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली आहे.

Sunil Tatkare rejects NCP merger rumors with Sharad Pawar faction
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान; ‘पवारसाहेबांनी भूमिका बदलली तरच...’

विलीनीकरणावर बोलताना तटकरे म्हणाले की, आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवली. एनडीएचा घटक म्हणून निवडणूक लढवली. तिथं आम्ही जिंकून आलो. पण त्यावेळी कशी लढल्या हे सर्वांनाच माहित आहे. मी वारंवार पष्ट करतोय की जेव्हा निर्णय होईल त्या वेळेला सर्वांना कळेल.

वेगळं मत आणि वेगळी भूमिका असण्याचं कारण नाही. अजितदादांच्या बरोबर दीर्घकाळ राहून राष्ट्रवादीची भूमिका महाराष्ट्रभर नेण्यास आम्हीदेखील मेहनत घेतलेली आहे. आम्ही देखील दीर्घकाळ काम केलेलं आहे. एकेकाळी 2014 मध्ये मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून आदरणीय पवार साहेबांनी नेमलं होतं. आम्हीही अनुभवी आहोत. 2014 ते 2018 या काळामध्ये राज्यात पक्षाची जबाबदारी दिली होती मी ती यशस्वीपणे पार पाडलीय.

यावेळी विलिनीकरण होणार की नाही? या संभ्रमावर तटकरेंनी कोणतीही ठोस भूमिका मांडली नाही. पण त्याचवेळी निर्णय शरद पवार गटाला घ्यायचा आहे, असा सूचक उल्लेख त्यांनी केला. आता त्यांच्या या सूचक वक्तव्यामुळेच नव्या चर्चांना उत आला आहे. त्यांनी, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत शरद पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली याबाबत मी बोलणार नाही. पण बारामतीत दादांवर अंत्यसंस्कार होण्याआधीच इतर सहकाऱ्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.

यामुळे आता विलिनीकरण कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षात होणार होतं याची माहिती त्यांनी आम्हाला दिली तर त्यावर मला बोलता येईल. राज्यात अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही निवडणुका लढवल्या असून विधिमंडळात राष्ट्रवादी पक्ष मजबूत आहे. त्यामुळे नेतानिवडीचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्यांचा आहे, असेही ते म्हणाले.

तटकरे यांनी विलिनीकरणाबाबत भाजपशी बोलावं लागेल या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भाजप हा देशातील एक प्रमुख पक्ष आहे. तो सत्तेत आहे, अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष हा त्यांच्याबरोबर मित्रपक्ष म्हणून आहे. जो दादांच्या सहमतीनेच त्यांच्याबरोबर आहे.

पण आमच्या पक्षात काय निर्णय घ्यावेत हे भाजपने कधीही आम्हाला सांगितलेलं नाही. राष्ट्रवादी पक्ष हा स्वतंत्र पक्ष असून छत्रपती शिवाजी महाराज-फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीचा आहे. आमचे निर्णय आम्ही घेणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो काही निर्णय घेईल त्याचे अंमलबजावणी करण्याचा स्वच्छ भूमिका ही भाजपचे आहे हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान तटकरे यांनी ठाकरे गटाचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला देखील उत्तर दिले आहे. राऊत यांनी, भाजपने राष्ट्रवादी पक्ष गिळून टाकला अशी टीका केली होती. याच टीकेचा समाचार तटकरे यांनी घेतला असून त्यांनी, संजय राऊत काय म्हणतात त्याला फारसे महत्त्व देत नाही, असेही ते म्हणाले.

Sunil Tatkare rejects NCP merger rumors with Sharad Pawar faction
NCP merger news : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर देवेंद्र फडणवीसांचे मोठं वक्तव्य, म्हणाले, 'तर दादा बोलते असते...'

FAQs :

1. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ कधी घेतली?
तीन दिवसांचा दु:खवटा संपल्यानंतर चौथ्या दिवशी त्यांनी शपथ घेतली.

2. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद का निर्माण झाला आहे?
दोन्ही गटांच्या विलिनीकरणावरून परस्परविरोधी भूमिका घेतल्या जात आहेत.

3. शरद पवार गटाची भूमिका काय आहे?
अजित पवारांची ही शेवटची इच्छा होती असे सांगत विलिनीकरणासाठी आग्रह धरला जात आहे.

4. अजित पवार गटाने काय स्पष्ट केले आहे?
विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा किंवा बैठक झाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

5. सुनील तटकरे यांच्या विधानामुळे काय चर्चा सुरू झाली आहे?
विलिनीकरण कोणत्या पक्षाचे असा प्रश्न उपस्थित झाल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com