Sharad Pawar NCP Meeting sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar NCP : शरद पवार भाकरी फिरवणार! पक्षाची बैठक सुरू, 'ती' यादी फायनल होणार

Supriya Sule Shashikant Shinde Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शनिवारी जिल्हाध्यक्षांची शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली, आज देखील बैठक होत आहे.

Roshan More

Sharad Pawar Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे बैठक घेत आहेत.शरद पवारांच्या उपस्थितीत काल देखील बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या जिल्हानिहाय संघटनात्मक आढावा घेण्यात आला.

'शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्षांना व पदाधिकाऱ्यांना आगामी काळात पक्षविस्तार, तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणे आणि संघटना अधिक आक्रमक व मजबूत करण्यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. पक्ष संघटनेचा विस्तार अधिक गतिमान करत जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढण्याचा निर्धार मी या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला.', असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

आज देखील बैठक शशिकांत शिंदे हे घेत असून या बैठकीत पक्षातील प्रवक्त्यांची नावे फायनल केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे पक्षात शरद पवार भाकरी फिरवणार असल्याची चर्चा आहे.

पक्षाच्या कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, शशिकांत शिंदेसाहेब निर्णय घेतील. आमचे दोन प्रवक्ते आहेत. राष्ट्रीय प्रवक्ते देखील कायम आहेतच पण राज्यातील प्रवक्त्यांमध्ये ते काही बदल करू इच्छितात.त्यांच्या नेतृ्त्वाखाली ज्या बैठक होत आहे त्यामध्ये निर्णय होईल.

येत्या दोन दिवसांत पक्षाच्या प्रवक्त्यांची नवीन यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आता प्रवक्तेपदी कुणाची वर्णी लागते याकडे पक्षातील इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

संघटनात्मक बांधणीचा आढावा

शनिवारी झालेल्या बैठकीत गोंदिया, भंडारा, चंद्रपूर (शहर व ग्रामीण), वर्धा, नागपूर, गडचिरोली, अमरावती तसेच पालघर, उल्हासनगर, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली आणि पनवेल या जिल्ह्यांमधील सद्य राजकीय परिस्थिती, संघटनात्मक बांधणी आणि पक्षाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा शरद पवारांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

येणाऱ्या काळातील राजकीय आव्हाने पेलण्यासाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे घरोघरी पोहोचवून संघटना बूथ पातळीपर्यंत भक्कम करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना एकदिलाने कामाला लागण्याचे आवाहन शशिकांत शिंदे यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT