NCP Sharad Pawar : शरद पवारांचे धक्कातंत्र, सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या तत्काळ रद्द; शशिकांत शिंदेंनी पत्रही काढले!

Shashikant Shinde NCP SP Spokesperson : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोठा निर्णय घेत सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत.
NCP spokesperson appointments cancelled
NCP spokesperson appointments cancelledSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar political update: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने पक्षात अंतर्गत मोठे बदल होत आहेत. नुकतीच युवकअध्यक्षांची निवड करत भाकरी फिरवण्यात आली. आता, थेट पक्षातील सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आल्या आहेत.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माहिती देत सांगितले की, 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक फेररचनेच्या दृष्टीने आणि पक्षाची ध्येयधोरणे अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी पक्षाच्या प्रवक्ते पदासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.​यापूर्वी करण्यात आलेल्या सर्व प्रवक्ता पदाच्या नियुक्त्या पुढील आदेश होईपर्यंत तत्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात येत आहेत.'

शिंदे यांनी संदर्भातील पक्षाचे पत्र फेसबूक, ट्विटवर शेअर केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, यापुढील काळात पुढील आदेश येईपर्यंत पक्षाची अधिकृत भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडण्यासाठी माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे हे अधिकृत प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळतील.​पक्षहित आणि संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी या निर्णयाची गांभीर्याने नोंद घ्यावी.

NCP spokesperson appointments cancelled
Sunetra Pawar News: मोठी बातमी: केंद्रीय निवडणूक आयोगाचं सुनेत्रा पवारांना पत्र; राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी सांगितलं कारण

नियुक्त्या रद्द कोणाच्या आदेशाने?

शशिकांत शिंदे यांनी पत्र शेअर करत सर्व नियुक्त रद्द करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्या पत्रावर प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची स्वाक्षरी आहे. दरम्यान, पक्षाचे मुख्य प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटवर राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या आदेशानुसार रद्द करण्यात आल्या आहेत. मी मुख्य राष्ट्रीय प्रवक्ता च्या अधिकारात हा निर्णय घेत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

NCP spokesperson appointments cancelled
NCP Politics: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 'एनडीए'त सहभागी होण्याच्या चर्चांना उधाण; अमोल मिटकरींचे मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com