Sharad Pawar NCP Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar NCP : शरद पवारांनी पुण्यासह ठाण्यात भाकरी फिरवली; श्रीकांत पाटील, विशाल तांबे, खासदार म्हात्रेंच्या खांद्यावर धुरा...

Pune city president, Shrikant Patil, Vishal Tambe, Suresh Mhatre, Thane Rural : शशिकांत शिंदेंकडून नव्या नियुक्त्या, श्रीकांत पाटील-विशाल तांबे यांना पुण्याची तर सुरेश म्हात्रेंना ठाणे ग्रामीणची जबाबदारी; बैठकीनंतर संघटनात्मक फेरबदलांना गती.

Rajanand More

NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मागील काही दिवसांपासून विविध पदांवर नियुक्त्या केल्या जात आहेत. पक्षाने आता पुणे आणि ठाण्यातही भाकरी फिरवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या पावलावर पाऊल टाकत शरद पवारांच्या पक्षानेही पुण्यात दोन शहराध्यक्षांची नियुक्ती केली आहे. तर ठाण्यात खासदारांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पक्षाने सोशल मीडियातून याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार श्रीकांत पाटील यांची पुणे (पूर्व) तर विशाल तांबे यांची पुणे (पश्चिम) शहराध्यक्षपदी मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. पाटील यांच्याकडे जानेवारी महिन्यात प्रशांत जगताप यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर संपूर्ण शहराची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

विशाल तांबे हे महापालिका निवडणूक प्रभारी होते. आता नव्या नियुक्त्यांमध्ये तांबे यांनाही पश्चिम भागाचे शहराध्यक्षपद देत पक्षाने संघटना अधिक मजबूत करण्याच्या दिशेने पावले टाकल्याचे मानले जात आहे. तांबे हे तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. ते पुणे महापालिकेत स्थायी समिती अध्यक्षही होते. पाटील हेही माजी नगरसेवक असून त्यांचे वडील महापौर होते. पक्षाने या अनुभवी नेत्यांवर शहराची धुरा सोपविली आहे.

शरद पवारांच्या पक्षाने खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्या हाती ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा कार्यभार दिला आहे. खासदार म्हात्रे यांची भिवंडीसह ठाणे जिल्ह्यात चांगली ताकद आहे. भाजपच्या बड्या नेत्याला पराभूत करून त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. आता पक्षाने त्यांच्याकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची जबाबदारी देत पक्षाला बळकट करण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शहद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राज्यातील विविध जिल्हाध्यक्षांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत जिल्हानिहाय संघटनात्मक कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला होता. तसेच पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, आगामी संघटनात्मक नियोजन आणि विविध स्थानिक विषयांवर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर आता संघटनात्मक नियुक्त्यांना वेग आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT