Jitendra Awhad Sharad pawar sarkarnama
महाराष्ट्र

NCP Sharad Pawar: मोठी बातमी: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोदी सरकारच्या 'डिलिमिटेशन' विधेयकाला पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी आतली बातमी फोडली

Modi Government Delimitation Bill: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं अखेर केंद्रातील मोदी सरकारच्या डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे. दिल्लीत सरकारकडून डिलिमिटेशनचे बिल संसदेत आणण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

Deepak Kulkarni

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं अखेर केंद्रातील मोदी सरकारच्या डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे. दिल्लीत सरकारकडून डिलिमिटेशनचे बिल संसदेत आणण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा केल्यानंतर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत या बिलाला मान्यता देण्यात आली आहे.यानंतर काही बैठकीनंतर काही तासांतच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं डिलिमिटेशन विधेयकाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी(ता.27) मुंबई येथे ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षाची डिलिमिटेशनबाबतची भूमिका जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळीकडून डिलिमिटेशन विधेयकाबाबत वेगवेगळ्या भूमिका मांडल्या गेल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे पक्षाची नेमक्या भूमिकेबाबत संदिग्धता होती.

शरद पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले, "ही चर्चा आमच्या पक्षाच्या अधिकृत भूमिकेबाबत नव्हती. या चर्चेत सर्वसाधारणपणे डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) प्रक्रिया ही संविधानिक आवश्यकता असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. डिलिमिटेशन प्रक्रियेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि आम्ही निश्चितच या प्रक्रियेला पाठिंबा देऊ. आम्ही डिलिमिटेशनला समर्थन देणार आहोत.

ते म्हणाले, शरद पवारसाहेबांशी माझी डिलिमिटेशन या विषयावर यापूर्वीही चर्चा झाली होती. तेव्हा तो विषयही नव्हता. पण तेव्हा साहेबांनी मला सांगितलं होतं की, डिलिमिटेशन हे कॉन्स्टिट्यूशनल असतं आणि ते करावं लागतं. त्याला काही पर्याय नसतो. डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत आमच्या पक्षाचं ठरलं आहे. यावेळी शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयक हे संवैधानिक असल्याचं सांगत ते आज नाही तर उद्या हे करावंच लागणार असल्याचंही पवार म्हणाल्याचं आव्हाड यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.

तसेच त्यांनी मी स्पष्टपणे सांगतो, साहेब हे माझे दैवत असून माझ्या दैवताची डिलिमिटेशनबाबत जी भूमिका राहील, तीच माझी आहे, असंही आव्हाड यांनी यावेळी सांगितलं. आपापले मतदारसंघ बांधायला शिका, कितीदिवस असं चालायचं हेही यापूर्वी झालेल्या अनौपचारिक चर्चेत पवार म्हणाल्याचं आव्हाड यांनी नमूद केलं. यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशन विधेयकामुळे जर 50 टक्के जागा वाढणार असतील तर आपला या विधेयकाला पाठिंबा असेल, असं वक्तव्य केलं होतं.

त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व ज्येष्ठ नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डिलिमिटेशनवरुन पक्षाची भूमिका मांडली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच डिलिमिटेशन हे अनिवार्य असल्याचं सांगत या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे संकेत दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT