Uddhav Thackeray shivsena : इंडिया आघाडीच्या बैठकीआधीच 'मविआ'त मोठा ट्वीस्ट! राष्ट्रवादीच्या पावलावर उद्धव ठाकरेंच्या सेनेचे पाऊल; विधेयकाबाबत वेट अँड वॉचची भूमिका घेत काँग्रेसचे वाढवले टेन्शन!

Delimitation Bill News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाऊलावर पाऊल ठेवत या विधेयकाबाबत बोलताना खासदार अरविंद सावंत यांनी सस्पेन्स वाढवला आहे.
Uddhav Thackeray & Sharad Pawar
Uddhav Thackeray & Sharad PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

New Dehli News : मोदी सरकारने डिलिमिटेशन बिल मंजूर करण्यासाठी संसदेच्या विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यामुळे सध्या दिल्लीत वेगवान घडामोडी घडत आहेत. २८ नोव्हेंबरला इंडिया आघाडीने त्यांच्या मित्रपक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व मित्रपक्ष हजर राहणार का याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. केंद्र सरकार या विशेष अधिवेशनात डिलिमिटेशन तसेच महिला आरक्षण विधेयक मांडण्याची शक्यता आहे.

या विधेयकाला इंडिया आघाडीकडून विरोध होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र बिल हातात आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मांडली आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाऊलावर पाऊल ठेवत या विधेयकाबाबत बोलताना खासदार अरविंद सावंत यांनी सस्पेन्स वाढवला आहे.

याबाबत प्रसार माध्यमाशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले, 'बिलाचे प्रारुप आम्हाला मिळाले नाही. प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली नाही. बिलामध्ये 50 जागा वाढवणार असे कुठेही वाक्य नव्हते. याऊलट लोकसंख्येला अनुसरुन केले जाईल, असे या बिलामध्ये म्हटले होते. पण फक्त 50 टक्के जागा वाढणार एवढ्यापुरते ते मर्यादीत नाही. सुप्रीम कोर्टात सध्या आमची केस सुरु आहे. एका शब्दावरुन या केसमध्ये किती ट्वीस्ट येतो हे तुम्ही पाहत आहात. तसेच हे बील आणतील तेव्हा एक शब्दही महत्त्वाचा असेल त्या एका शब्दाचा मोठा अर्थ असेल.

उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shivsena) हे बिल वाचल्याशिवाय यावर कोणतीही भूमिका घेणार नाही. मुळात आरक्षणाचे बिल आधीच मंजूर झाले आहे. आत्ता त्याची अंमलबजावणी कशी करायची तर ती आजच्या संख्येनुसारही करता येईल. पण त्यासोबत परिसिमन कसे करणार? हे कोण ठरवणार? निवडणूक आयोगाची विश्वासहार्ता नाही. कोणता भाग आपल्या पक्षाला फायद्याचा नाही तो पाहून तो वगळा असेही या बिलामध्ये केले जाईल, असेही अरविंद सावंत म्हणाले.

Uddhav Thackeray & Sharad Pawar
BJP Bhandara : 'महायुती सरकारने आमदार खासदारांना महाराष्ट्र लुटायला मोकळीक दिलेय...'; भाजप नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

याबाबत 28 नोव्हेंबरला इंडिया आघाडीने त्यांच्या मित्रपक्षाची बैठक बोलावली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यासंदर्भात आम्हाला मार्गदर्शन करतील. आम्ही मुद्द्यावरुन विरोध करु. विरोधाला विरोध करणार नाही. आम्ही विरोध का करतोय? हेसुद्धा सांगू. त्या विधेयकामधील त्रुटीही सांगू , असे म्हणत अरविंद सावंत यांनी या विधेयकाबाबत ठाकरे गटाची भूमिका बिल आल्यानंतरच स्पष्ट होईल, असे संकेत दिले.

Uddhav Thackeray & Sharad Pawar
Sharad Pawar NCP: शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवली; राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा बदलल्या, रोहिणी खडसेंच्या जागी नागपूरच्या अंजली साळवेंची निवड

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.