Sharad Pawar  sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar : बाबा सिद्दिकींच्या हत्येवरून शरद पवारांनी सुनावले 'फक्त चौकशी नको, पायउतार...'

Sharad Pawar reaction baba Siddique dead in firing : गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

Roshan More

Sharad Pawar News : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपींना कठोर शासन करण्यात येईल असे सांगितले आहे. बाब सिद्धीकी यांच्या हत्येवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले आहे.

शरद पवार यांनी ट्विट करत 'केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे.' म्हटले आहे.

आपल्या ट्विटमध्ये शरद पवारा यांनी कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली आहे. पवार म्हणाले आहेत, 'राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे.'

गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते, असा इशारा देत केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे, असे शरद पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून सुनावले आहे.

शरद पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून बाबा सिद्दिकी यांना श्रद्धांजली अर्पण करत. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

बाबा सिद्दिकींची राजकीय कारकिर्द

बाबा सिद्दिकी हे काँग्रेसचे नेते होते.48 वर्ष ते काँग्रेसमध्ये होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना आठच महिने झाले आहेत. मुंबईमध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्द सुरू केली होती. 1999, 2004 आणि 2009 असे तीनवेळा वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. 2004 ते 2008 दरम्यान त्यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्रिपदही त्यांनी सांभाळले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT