Eknath Shinde : बाबा सिद्दिकींच्या हत्येवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

CM Eknath Sinde On Baba Siddique Firing : वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर येथील बाबा सिद्दिकी यांच्या मुलगा झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाच्या बाहेरच बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला.
Eknath Sinde Baba Siddique
Eknath Sinde Baba Siddiquesarkarnama
Published on
Updated on

Eknath Sinde News: माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबारात मृत्यू झाला. वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर येथील बाबा सिद्दिकी यांच्या मुलगा झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाच्या बाहेरच बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला. या घटनेनंतर कायदा सुव्यवस्था नसल्याची टीका विरोध पक्षांकडून करण्यात येत आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या मृ्त्यूवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ही घटना दुखःद आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. एक जण फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहे.

पोलिसांना तत्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. तीन शूटर पैकी एक जण हरियाणा आणि एक जण यूपीचा असल्याची माहिती आहे. हे प्रकरण फास्ट ट्रकवर घेऊ, असे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Eknath Sinde Baba Siddique
Baba Siddique : 48 वर्ष काँग्रेस तर आठ महिने अजितदादांसोबत; बॉलिवूडशी संबध, कोण होते बाबा सिद्दीकी

कोठे झाला गोळीबार ?

वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर परिसरात बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन तरुणांकडून गोळीबार करण्यात आला. लिलावती रुग्णालयात बाबा सिद्धीकी यांना दाखल करण्यात आले मात्र त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

राजकीय कारकिर्द

बाबा सिद्धीचे हे काँग्रेसचे नेते होते.48 वर्ष ते काँग्रेसमध्ये होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना आठच महिने झाले आहेत. मुंबईमध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्द सुरू केली होती. 1999, 2004 आणि 2009 असे तीनवेळा वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. 2004 ते 2008 दरम्यान त्यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्रिपदही त्यांनी सांभाळले आहे.

Eknath Sinde Baba Siddique
CM Eknath Shinde Dasara Melawa : महाविकास आघाडीला लोकसभेत मिळालेले यश एक्सीडेंटल!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com