young man from Maharashtra writes an emotional letter to NCP Chief Sharad Pawar, pleading for help in finding a bride sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar : 'लग्न जमत नाही, जगण्याची उमेद हरवली…', शरद पवारांना तरुणाचे भावनिक पत्र; अनिल देशमुखही झाले स्तब्ध!

Sharad Pawar Viral Letter : अकोल्याच्या दौऱ्यावर असताना शरद पवार यांना शेतकरी मेळाव्यात एका तरुणाने निवेदन वजा पत्र दिले. या पत्रात तरुणाने लग्न जमत नसल्याची व्यथा पवारांकडे मांडली असून लग्न जुळवून देण्याची विनंती केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Viral Letter News : बेरोजगारीमुळे तसेच शेती करणाऱ्या तरुणांना मुली नसल्याची गंभीर सामाजिक समस्या समोर येत आहे. ग्रामीण भागातील मुलांचे लय निघून जात असले तरी त्यांना वधू मिळत नसल्याचे अनेक प्रकरणे समोर येत आहे. अशाच एका तरुणाने आपली व्यथा थेट शरद पवारांकडे मांडली.

काही दिवसांपूर्वी अकोला दौऱ्यावर असलेल्या पवारांना एका तरुणाने निवेदन वजा पत्र दिले. या निवेदनात 'माझे लग्न होत नाहीये, कृपया मला पत्नी मिळवून द्या. मी तुमचे उपकार विसरणार नाही', अशी साद घालतो आहे.

अकोल्यातील शेतकऱ्यांशी संवाद या कार्यक्रमानंतर पवारांना हे निवेदन दिले. हे निवेदन पाहून शरद पवारांसह त्यांच्यसोबत असलेले अनिल देशमुख देखील स्तब्ध झाले. या निवेदनामध्ये तरुणाने आपला पत्ता, मोबाईलनंतर देताना त्याची व्यथा व्यक्त केली आहे.

तरुणाने म्हटले आहे की, एककीपणा आता असहाय्य झाला आहे. माझे वय वाढते आहे. भविष्यात माझे लग्न होणार नाही मी एकटाच राहीन माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी. मी चांगेल कमा करीन, संसार नीट चालवीन. कोणत्याही समाजातील मुलगी चालेल, असे देखील त्याने म्हटले आहे.

पत्रावर पाटील, पवार, देशमुखांमध्ये चर्चा

एका मराठी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार हे तरुणाचे निवेदन दुसऱ्या दिवशी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांना देखील दाखवण्यात आले. या पत्रावरून शरद पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यात चर्चा देखील झाल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT