Bihar Election Results : बिहारमध्ये दे धक्का! तेजस्वी यादव यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा, सगळे अंदाज चुकवणारा एक्झिट पोल समोर

Axis My India exit poll Tejashwi Yadav RJD : सर्व एक्झिट पोलला धक्का देणार नवीन एक्झिट पोल समोर आला आहे. या पोलनुसार तेजस्वी यादव यांचा आरजेडी पक्ष बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरत आहे.
Nitish Kumar, Tejashwi Yadav
Nitish Kumar, Tejashwi YadavSarkarnama
Published on
Updated on

Bihar Exit Poll : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर वेगवेगळे एक्झिट पोल समोर आले आहेत. या पोलमध्ये एनडीएची सत्ता परत येत असून तेजस्वी यादव आणि काँग्रेसला मोठा धक्का बसत असल्याचे दिसत आहे. मात्र, मतदानाच्या एका दिवसानंतर ‘ॲक्सिस माय इंडिया’चा एक्झिट बोल जाहीर करण्यात आला आहे. अचूक अंदाजासाठी हा पोल ओळखला जातो. या पोलनुसार तेजस्वी यादव यांचा आरजेडी हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरत असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

या पोलनुसार एनडीएचे सत्ता पुन्हा येईल. मात्र, दुसरे पोल ज्याप्रमाने दाखवत आहेत की महागठबंधनचा सुफडा साफ होईल आणि जवळपास 200 जागांच्या जवळ एनडीए जाईल. त्या शक्यतेला ॲक्सिस माय इंडिया’च्या पोलने धक्का दिला आहे.

या पोलनुसार एनडीएला 121 ते 141 च्या दरम्यान जागा मिळतील. तर, महागठबंधनला 98 ते 118 च्या दरम्यान जागा मिळतील. यामध्ये तेजस्वी यादव यांची आरजेडी सर्वात मोठा पक्ष ठरत असून त्याला 67 ते 76 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, नितीश कुमार यांच्या जेडीयूला 56 ते 62 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

Nitish Kumar, Tejashwi Yadav
Tejashwi Yadav ON  Exit Poll : हादरवून टाकणाऱ्या 'एक्झिट पोल'नंतरही तेजस्वी यादव 'कुल'; म्हणाले, 'कुठलीच शक्यता नाही, अमित शाह...'

मतांमध्ये फक्त दोन टक्क्यांचे अंतर

पोलनुसार भाजप आणि जेडीयूच्या मतांची टक्केवारी समान राहण्याची शक्यता आहे. दोघांना देखील 18 टक्के मतदान मिळताना दिसत आहे. तर चिराग पासवान यांच्या पक्षाला पाच टक्के मतं मिळत आहेत. इतर सहकारी पक्षांच्या मदतीने एनडीचे मतदानाची टक्केवारी 43 वर जात आहे. तर, महागठबंधनमध्ये तेजस्वी यादव यांच्या आरजेडीला 24 टक्के मतं मिळत आहेत. तर, काँग्रेसला 10 टक्के मतदान मिळत आहे. महागठबंधनमधील इतर सहकाऱ्यांच्या मतांच्या टक्केवारीसोबत महागठबंधन 41 टक्क्यांवर पोहोचत आहे. त्यामुळे या पोलनुसार दोघांमध्ये फक्त दोन टक्क्यांचे अंतर आहे.

Nitish Kumar, Tejashwi Yadav
Satara ZP Election: भाजपचे अतुल भोसले अन् राष्ट्रवादीचे उंडाळकर गट आमने सामने; ओबीसी- कुणबी आरक्षणामुळे लढत घाम काढणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com