Mahavikas Aghadi CM candidate
Mahavikas Aghadi CM candidate sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? शरद पवार म्हणाले, 'ठाकरे, काँग्रेस...'

Roshan More

Sharad Pawar News : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे असायला हवे, अशी इच्छा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.बिनाचेहऱ्याची निवडणूक लढू नये, असे राऊत म्हणाले होते. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असणार याचे उत्तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिले आहे.

ठाकरे, काँग्रेस, आम्ही महाविकास आघाडीत एकत्र आहोत. मुख्यमंत्रीपदासाठी आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा आहे. सामुहिक नेतृत्व हे आमचं सुत्र आहे', असे शरद पवार म्हणाले.

लोकसभेला महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या. सांगलीत जिंकलेले विशाल पाटीलही आमच्यासोबत आहेत. 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीकडे आहेत. त्यामुळे लोकांचा ट्रेंड काय आहे हे कळतो. त्याचाच धसका घेत बजेट मांडले आहे. पण लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, असे शरद पवार म्हणाले.

लोक मोदींवर खुष नाहीत. मोदींची गॅरंटी चालली नाही. महाराष्ट्रात मोदींनी 18 सभा घेतल्या. त्यातील 14 ठिकाणी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे माझा आग्रहाची विनंती आहे की मोदींनी Narendra Modi महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, असा टोला शरद पवारांनी मोदींना लगावला.

जागा वाटपाचा निर्णय शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि आम्ही तिघे एकत्र बसणार आहोत. आम्हाला शेतकरी कामगार पक्ष, डावे कम्युनिटी, उजवे कम्युनिस्ट पक्षांनी मदत केली. म्हणून आम्ही तिघे बसणार असलो तरी जे महाविकास आघाडीचे घटक आहे जे मोदींचे विरोधक आहेत त्यांनाही बरोबर घेण्याचा प्रयत्न राहील. आमचे जागा वाटप झाल्या नंतर तो तो पक्ष त्यांच्या सहकाऱ्यांना, त्या त्या संघटनांना विश्वासात घेवून त्याचा निर्णय घेतील, असे पवार Sharad Pawar म्हणाले.

अजित पवार गटातील काही आमदार हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इच्छुक असल्यास विषयी शरद पवार यांनी विचारण्यात आले. मात्र, विषयी आपल्याला काही माहिती नाही. याविषयी जयंतरावांना माहित असेल मला माहीत नाही. तसा प्रस्ताव नाही, असे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT