Mahavikas Aghadi : 'मविआ'त ठिणगी! प्रज्ञा सातव यांच्यावर कारवाई करा, ठाकरेंच्या खासदाराची काँग्रेसकडे तक्रार; कारण...

Shivsena Vs Congress : महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी 30 जागा मिळाल्या. लोकसभेतील या घवघवीत यशानंतर आता आघाडीने आपला मोर्चा विधानसभेकडे वळवला आहे.
Uddhav Thackeray, Pradnya Satav
Uddhav Thackeray, Pradnya SatavSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News, 29 June : महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी 30 जागा मिळाल्या. लोकसभेतील या घवघवीत यशानंतर आता आघाडीने आपला मोर्चा विधानसभेकडे वळवला आहे. शिवाय लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही एकत्रित लढण्याचा निर्धार आघाडीने केला आहे.

मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काही नेत्यांनी आघाडी धर्म पाळला नसल्याची तक्रार मित्र पक्षाकडून केली जात आहे. अशातच आता हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे विजयी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी लोकसभेला काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आघाडीचं काम केलं नसल्याची तक्रार केली आहे.

नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) यांनी प्रज्ञा सातव यांच्या विरोधातील तक्रार काँग्रेसचे (Congress) सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांच्याकडे केली आहे. ही तक्रार त्यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर आघाडीतील धुसफूस बाहेर आल्याचं पाहायला मिळत आहे.

Uddhav Thackeray, Pradnya Satav
Shivsena Vs Congress : काँग्रेसच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा, महाविकास आघाडीतील संघर्ष टोकाला

नागेश पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात हिंगोली मतदारसंघातील प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्या भूमिकेबद्दल संशय घेत तक्रार केली आहे. कळमनुरी मतदारसंघात सातव यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या विरोधात काम केल्याचा गंभीर आरोप पत्राद्वारे केला आहे.

Uddhav Thackeray, Pradnya Satav
Video Sharad Pawar : अर्थसंकल्पावर शरद पवार स्पष्टचं बोलले, 'लोकं विश्वास ठेवणार नाहीत'

तसंच सातव यांनी पक्षाच्या सूचना डावलून वंचित आणि महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याचंही आष्टीकर यांनी म्हटलं आहे. शिवाय निवडणुकीच्या काळात प्रचार मोहिमेत सहभागी झाल्या नाहीत असा उल्लेख पत्रात करत सातव यांच्या भूमिकेची चौकशी करुन राज्यात आघाडीची एकजूट कायम ठेवण्यासाठी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागेश पाटील आष्टीकर यांनी केली आहे. त्यामुळे आत ठाकरे गटाच्या मागणीनुसार काँग्रेसचे वरिष्ठ सातव यांच्यावर काही कारवाई करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com