manoj jarange patil maratha reservation protest And Sharad Pawar sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar : शरद पवारांनी सुचवलेला घटना दुरुस्तीचा पर्याय खरंच सोयीचा? मराठा समाजाला संसदेतूनच आरक्षण मिळू शकतं?

Ulhas Bapat on Sharad Pawar : मराठा आरणक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरू केले आहे. यामुद्द्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर केलेल्या वक्तव्यामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे.

Aslam Shanedivan

Summary :

  1. शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर मत व्यक्त करत तमिळनाडूत 50% पेक्षा जास्त आरक्षणाचं उदाहरण दिलं.

  2. त्यांनी घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, अशी भूमिका मांडली.

  3. घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी मात्र हा मार्ग चुकीचा असल्याचं सांगत पवारांच्या विधानाला विरोध केला.

Mumbai News : राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाची ठिणगी पडली असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी ओबीसीतील आरक्षण घेणारच असा निर्धार केला आहे. तर त्यांच्या या निर्धाराविरोधात ओबीसी नेत्यांनीही दंड थोपाटले आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, तमिळनाडू राज्यात आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्याही पुढे आहे. मग महाराष्ट्रात का नाही? असा सवाल करत घटनेत दुरुस्ती करण्याची भूमिका घेतल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, असे म्हटले आहे. पण त्यांनी सुचवलेल्या या मार्गावरूनच आता नवा वाद सुरू झाला आहे. एकीकडे सत्ताधारी यावरून टीका करताना दिसत आहेत. तर घटनातज्ज्ञाचा दावा हा पवार यांचा मार्गच चुकीचा असल्याचा आहे.

शरद पवार यांनी अहिल्यानगर येथील एका कार्यक्रमात मराठा आरक्षणावर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी तमिळनाडू राज्याचे उदाहरण देताना, राज्यातही त्याच धर्तीवर आरक्षण मिळू शकते. फक्त राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले गेले पाहिजेत. केंद्र सरकारने निर्णय घ्यावा असे म्हटले होते.

पण आता शरद पवार यांनी सुचवलेला मार्ग योग्य आहे की अयोग्य यावर चर्चा होताना दिसत आहे. यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी भाष्य करताना, पवार यांनी सुचवलेला मार्ग, त्यांचे विधानच चुकीचे असल्याचे म्हटलं आहे.

बापट यांनी, “मला पवार यांचा आदर आहे. पण त्यांचे विधान चुकीचे आहे. कारण तमिळनाडूत 69 टक्के आरक्षण असून त्याचा समावेश हा नवव्या परिशिष्टात आहे. या परिशिष्टात कायद्याचा समावेश केल्यामुळे समानतेच्या अधिकारावर अतिक्रमण होत असल्याबाबत आव्हान देता येत नाही. पण नवव्या परिशिष्टीत कायदा टाकायचा असेल तर घटनादुरूस्ती करावी लागेल, असेही त्यांनी म्हटलं आहे.

याचबरोबर बापट यांनी, तमिळनाडूची घटनादुरूस्ती ही 30 वर्षांपूर्वी झाली असून तसे आता होणे शक्य नाही. तसे केशवानंद भारती खटल्यानंतर होणे शक्य नाही. यामुळे जेष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितलेला मार्ग न्यायालयात टिकाणार नाही, असेही उल्हास बापट यावेळी म्हणाले.

मागणी योग्यच... पण

मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण मिळावे अशी केली आहे. त्यासाठी ते आता आक्रमक झाले आहेत. या मागणीवर देखील घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी जरांगे यांची मागणी रास्त आहे. मराठा सजाम हा कुणबी असून तो मागास आहे. त्यामुळे ओबीसीमध्येच त्यांना आरक्षण मिळायला हवं. तसे केल्यास आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या बाहेर जात नाही. पण त्यामुळे ओबीसींचे आरक्षण कमी होईल, अशीही भीती घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलीय.

FAQs :

प्र.१. शरद पवार यांनी काय सुचवलं?
उ. त्यांनी घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येईल, असं म्हटलं.

प्र.२. त्यांनी कोणतं उदाहरण दिलं?
उ. त्यांनी तमिळनाडूचं उदाहरण दिलं, जिथे 50% पेक्षा जास्त आरक्षण आहे.

प्र.३. त्यांच्या विधानाला विरोध कोणी केला?
उ. घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी हा मार्ग चुकीचा असल्याचं सांगत पवारांना प्रत्युत्तर दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT