Sharad Pawar : गांधी-नेहरुंच्या विचारसरणीच्या अहिल्यानगरमध्ये RSSचा विचार रुजतोय, त्यातून...; शरद पवारांनी का व्यक्त केली चिंता?

Sharad Pawar: अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सहकार सभागृहात आयोजित कार्यक्रमात शरद पवार सहभागी झाले होते.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar: "अहिल्यानगर स्वातंत्र्यपूर्व काळापासून या जिल्ह्यात गांधी-नेहरू विचारसरणीचे अनुयायी होते. समाजवाद आणि साम्यवादी विचारसरणीचेही पाईक होते. दत्ता देशमुख, पी. बी. कडू पाटील, अण्णासाहेब शिंदे, आबासाहेब निंबाळकर, भाऊसाहेब थोरात यांच्यासारखे नेते मंडळी होती. त्यांनी तळागाळातील लोकांसाठी संघर्ष केला. विकासाचे राजकारण केले. पी. बीं.चा वारसा अरुण कडू पाटील यांनी चालविला. मात्र, अलीकडे आरएसएस, भाजपची विचारधारा रूजतेय. त्यातून सामाजिक कटूता निर्माण होतेय," अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

Sharad Pawar
Vasant Gite: ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीतेंची रोखठोक भूमिका! मराठा आरक्षणावरुन राजकारण करणाऱ्यांना झापलं

खासदार पवार म्हणाले, "शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी कडू पाटील कुटुंबांचा संघर्ष होता. कालौघात हा संघर्ष आणखी तीव्र होत जाणार आहे. कारण शेतीवरचे अवलंबित्व वाढत आहे आणि जमीन औद्योगिकीकरण, शिक्षण संकुल अशा कारणांसाठी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे शेतीत एआय तंत्रज्ञान वापरले पाहिजे." कमी श्रमात, कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन या तंत्रज्ञानामुळे मिळू शकते. राज्य सरकारनेही हा प्रयोग राबवला पाहिजे, अशी ही शरद पवार यांनी मागणी केली.

Sharad Pawar
Devendra Fadnavis Hordings: मराठा समाजासाठी फडणवीसांनी काय कामं केलीत? संभाजीनगरमध्ये झळकले होर्डिंग्ज

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते हे नात्यांसह पक्षही जपतात. हा आदर्श घेवून काम केले, तर सत्काराला पात्र ठरू. या जिल्ह्याकडून शिकण्यासारखे खूप आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले, कडू पाटलांसारखे नेते हे सत्तेसाठी नव्हे, तर कष्टकरी, शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणारी मंडळी आहे. त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. माझ्या अध्यक्षपदाच्या काळात ते कामी आलं. हल्ली सत्तेचे केंद्रीकरण झालेय. आता देश दोनच व्यक्ती चालवतात. हे चक्र थांबलं पाहिजे.

Sharad Pawar
Jagdeep Dhankhar: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काँग्रेसचे माजी आमदार म्हणून पेन्शनसाठी केला अर्ज! किती मिळणार? जाणून घ्या

तुम्ही उशिरा आलात...

ज्येष्ठ नेते थोरात यांनी कडू पाटील यांच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक करीत त्यांनी कायम शेतकरी व कष्टकऱ्यांसाठी संघर्ष केल्याची आठवण सांगितली. ते नात्याने मेहुणे असताना त्यांची कधीही चेष्टा, थट्टा करण्याचा योग आला नाही. ते नेहमी गंभीर दिसत. त्यांचा संघर्ष अवघड होता. नेहमीच अवघड शक्तींना त्यांनी विरोध केला. त्यांच्या अध्यक्षपदाची आठवण सांगताना ते म्हणाले, पवार साहेबांना विनंती केली होती. तेव्हा ते म्हणाले, आमचा आधीच त्यांच्याविषयी अभ्यास झालाय, तुम्ही उशिरा आलात. हा किस्सा सांगितल्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com