Maharashtra Politics Sangli Rally : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या विधानाने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले.
परंतु महायुतीकडून, विशेष करून भाजपकडून शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांना सर्वाधिक 'टार्गेट' केलं जात असल्याचं चित्र राज्यात आहे. या प्रमुख नेत्यांना का टार्गेट केलं जात आहे, यावर अहिल्यानगरमधील खासदार नीलेश लंके यांनी प्रतिक्रिया देताना, महायुतीला सर्वाधिक भीती याच नेत्यांकडून वाटते म्हणून, टार्गेट केलं जात असल्याचे सांगितले.
नीलेश लंके सांगली इथल्या राष्ट्रवादी महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चात सहभागी झाले होते. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महायुतीकडून विशेष करून भाजपकडून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांना सर्वाधिक टार्गेट का केलं जात आहे, असा प्रश्न खासदार लंकेंना विचारण्यात आला. खासदार लंकेंनी यावर सूचक, अशी प्रतिक्रिया दिली.
खासदार लंके म्हणाले, "महायुतीला (Mahayuti) माहिती आहे की, सर्वाधिक धोका जो आहे तो, शरद पवारसाहेब, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या राजकीय चाणक्य नीतीकडून! राष्ट्रवादी हा आमचा पक्ष, 'ग्रासरूट'वर काम करणारा पक्ष आहे. हाच त्यांना धोका आहे."
"सुसंस्कृतपणा जपून काम करणारे नेते आमच्या पक्षात आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कुठे टिका टिप्पणी केल्यास, कुठेतरी लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला तरच, आपल्याला एक सुसाट रस्ता मिळेल, हा त्यांचा प्रयत्न आहे. पण हे कधीही शक्य होणार नाही, कारण की आम्ही दम धरून काम करणारे माणसं आहोत. आमचा नेता कामाला महत्व देणारा आहे. आम्ही देखील त्यांच्या पाठोपाठ कामालाच महत्त्व देतो," असेही खासदार लंके यांनी म्हटले.
खासदार लंकेंनी, शरद पवारसाहेब, सुप्रियाताई अन् मी एकच वाहनातून प्रवेश प्रवास करत असल्याचा किस्सा सांगितला. एका राज्यातील नेत्यांनी शरद पवार साहेबांविषयी विधान केलं होतं. परंतु पवार साहेबांनी हसत-हसत दुर्लक्ष केलं. आम्ही देखील त्याकडे दुर्लक्ष केलं. देशासाठी, राज्यात जे चुकीचे चाललेलं आहे, त्याला आम्हाला धारेवर धरायचा आहे, असे सांगितले.
'राज्यातील बहुतांशी भागांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. परंतु मध्यंतरी फक्त पंचनामे करण्यात आले. पण त्या नावाखाली सरकारकडून फक्त मलमपट्टी केली जात आहे. लोकांना नादी लावायचं. पण प्रत्यक्षरित्या कृती कुठलीच नाही. देशात, राज्यात लोकांचा आक्रोश आहे. परंतु त्यांना देखील त्यांच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित केले जात आहे. बेरोजगारांचा मुद्दा तर, देशात पेट घेतो आहे,' याकडे खासदार लंकेंनी लक्ष वेधले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.