Rohit Pawar Sangli rally : राजकीय ईप्सित साध्य होताच रोहित पवार जयंत पाटलांसाठी धावले; वाद, भांडणं, हेवेदावे सगळं विसरून पाठीशी उभे राहिले

Rohit Pawar Joins NCPSP Maharashtra Sanskriti Bachav Morcha in Sangli Supporting Jayant Patil : सांगली इथं राष्ट्रवादी महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चात जयंत पाटील यांच्या समर्थनात रोहित पवार देखील उतरले होते.
Rohit Pawar Sangli rally
Rohit Pawar Sangli rallySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics Sangli : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर केलेल्या विधानावरून राज्यात चांगलाच राजकीय गदारोळ उडाला आहे. पण यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आज सांगलीत एकटवला.

यातून शरद पवार यांनी शक्तिप्रदर्शन करत राज्यातील सत्ताधाऱ्यांना सूचक इशारा देण्याचं टायमिंग साधलं. परंतु सांगली इथल्या राष्ट्रवादी महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चात सगळ्यात जास्त लक्ष लागलं होते ते पक्षाचे सरचिटणीस आमदार रोहित पवार यांच्याकडे! जयंत पाटील यांच्याशी त्यांचा पक्षातंर्गत असलेला संघर्ष बाजूला सारला अन् सांगलीत जात जयंत पाटलांबरोबर उभे राहिले.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अन् आमदार रोहित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष मध्यंतरी चांगलाच विकोपाला पोचला गेला होता. जयंत पाटील यांनी सात वर्षांनंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र सोडली. याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. यातून पक्षात रचनात्मक बदल करण्याचा सूर आमदार रोहित पवार यांनी अळवला होता. यातून ते जयंत पाटील यांना अप्रत्यक्षपणे टार्गेट केलं होतं. यातून दोघांमध्ये राजकीय संघर्षाच्या ठिणग्या उडत होत्या.

पक्षाच्या रौप्यमहोत्सवाच्या कार्यक्रमात जयंत पाटील (Jayant Patil) नी ‘‘काही लोक माझ्या अध्यक्षपदासंबंधी महिने मोजत आहेत. मात्र मला राज्यात सरकार आणू द्या. त्यानंतर मी स्वतःच ‘नमस्कार’ करेन. माझ्याबद्दल काही तक्रारी असतील तर, थेट शरद पवारांच्या कानात सांगा. त्यांनी दोन कानशिलात दिल्या तर, त्या घेऊ. उगाच जाहीर वाच्यता करू नका,’’ असे फटकेबाजी केली होती.

Rohit Pawar Sangli rally
Nilesh Lanke on Devendra Fadnavis : 'यांचं कसं आहे, पोटात एक अन् ओठात एक'; CM फडणवीसांवर खासदार लंकेंचा निशाणा (VIDEO)

लोकसभा निवडणूक निकालानंतर रोहित पवार यांच्याविषयी ‘संघर्षातही न डगमगणाऱ्या युवा नेतृत्वाचा उदय’ असे जाहिरात स्वरुपातील लेख प्रसिद्ध केले, तर जयंत पाटील यांच्यातर्फे ‘विजयाचा सेनापती’ अशा मथळ्याची जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. या दोघा नेत्यांमील ही विसंगती राज्यात चर्चेची ठरली असताना रोहित पवार यांनी, विजयाचा कोणी एक सेनापती नाही, हे यश शरद पवार आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांचे सामूहिक असल्याचे जाहीरपणे सांगून, वादावर पडदा घातला.

Rohit Pawar Sangli rally
Vishal Patil : जयंत पाटलांसाठी कट्टर विरोधक विशाल पाटीलही रस्त्यावर : 60 वर्षांचं हाडवैर विसरून मोर्चात चालले

जयंत पाटील यांनी 15 जुलैला पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. शशिकांत शिंदे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. परंतु प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीवर रोहित पवार यांनी सावध भूमिका मांडली होती. प्रदेशाध्यक्ष पद हे मी कधीही टार्गेट ठेवलेलं नाही. पण छोटेसे एखादे पद मला पक्षामध्ये मिळेल आणि त्या पदाला मी न्याय देईल, अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली होती.

पक्ष संघटनेत बदल

शरद पवार यांनी पक्षीय संघटनेत भाकरी फिरवताना शशिकांत शिंदे यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात रोहित पवार यांच्याकडे सरचिटणीस पदाची जबाबदारी आली आहे. पक्ष संघटनेत आमदार पवार यांची नेहमीच आक्रमक भूमिका राहिली आहे. राज्य पातळीवर ते विविध मुद्यांवर सत्ताधारी महायुती सरकारविरोधात नेहमीच आक्रमक असतात. मात्र पक्ष संघटनेत बदलाची अपेक्षा करताना, जयंत पाटील यांच्याशी झालेल्या राजकीय संघर्षांवर त्यांनी सावध भूमिका घेतली. तसंचे जयंत पाटलांनी देखील रोहित पवारांविषयी साधवगिरी बाळगलेली दिसते.

पवार कुटुंब सर्वाधिक टार्गेट

जयंत पाटील अन् रोहित पवार यांच्यातील राजकीय संघर्षात, भाजप महायुती सरकारमधील आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून या दोघा नेत्यांना नेहमीच टार्गेट केले. शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी वारंवार निशाणा साधला आहे. अलीकडच्या काळात जयंत पाटील यांच्यावर आमदार पडळकरांनी खालच्या पातळीवर विधान केले. पडळकरांच्या याविधानाचे राज्य पातळीवर पडसाद उमटले.

शरद पवार आक्रमक

शरद पवार यांनी याची गंभीर दखल घेत थेट भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. यानंतरही पडळकर यांनी मी चुकीचं काहीच बोललो नसून, भूमिकेवर ठाम राहण्याची भाषा केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष राज्यभर आक्रमक झाला. आज राष्ट्रवादीने सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव राज्यस्तरीय मोर्चा काढून जयंत पाटील यांच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन केले.

रोहित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष

या मोर्चात रोहित पवार सहभागी होणार का? याकडे लक्ष लागलं असतानाच, रोहित पवार यांनी जयंत पाटील यांच्याशी पक्षातंर्गत असलेला राजकीय संघर्ष बाजूला सारून थेट सांगली गाठली आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीपूर्वी जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रा काढली होती. ही यात्रा जयंत पाटील यांनी रोहित पवार यांचा मतदारसंघ वगळून राज्यात नेली होती.

विधानसभेत धक्का

विधानसभा निवडणुकीत महायुतीसमोर महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडला. महाविकास आघाडीमधील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला राज्यात केवळ दहा जागा जिंकता आल्या. हा पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला समोरे जाताना, पक्षातील हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र आणण्याचं शरद पवार टायमिंग शोधत होते.

राजकीय ईप्सित साध्य :

प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीनंतर जयंत पाटील यांच्याच निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सांगलीत एकत्र आला आहे. विशेष करून करून जयंत पाटील यांचे पक्षातील प्रतिस्पर्धी रोहित पवार देखील सांगलीच्या मैदानावर जयंत पाटलांसाठी उभे राहिले. परंतु रोहित पवार यांचे पक्ष संघटनेत स्थान मिळवण्याचे राजकीय ईप्सित साध्य झाले आहे, याची विशेष नोंद इथं घ्यावी लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com