Sharad Pawar, uddhav thackeray  Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena Opration Tiger Sharad Pawar And Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार मैदानात

Uddhav Thackeray Shiv Sena Rebel MPs Sanjay Raut statement: ठाकरे गटातील कथित फुटीच्या चर्चांदरम्यान संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी बंडखोर खासदारांना इशारा दिला. गरज पडल्यास शरद पवार संबंधित मतदारसंघात सभा घेणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Mangesh Mahale

Sharad Pawar to Campaign in Rebel MPs: उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कथित फुटीच्या चर्चांदरम्यान आता पक्षाकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. सहा खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेण्याची चर्चा सुरू असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेने दिल्लीत खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी पक्षाकडून अधिकृत व्हिप जारी करण्यात आला होता. पण बैठकीला सहाही खासदारांनी दांडी मारली.

बैठकीपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत बंडखोर खासदारांना थेट इशारा दिला. पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांना यापुढे मोकळीक दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा झाल्याचे सांगताना राऊत म्हणाले, “आता बेईमानी करणाऱ्यांना सोडायचे नाही. त्यांच्या मतदारसंघात जाऊन जनतेसमोर त्यांना उत्तर द्यावे लागेल. गरज पडल्यास सभा घेण्यासाठी आम्ही स्वतः जाऊ.” राऊत यांच्या या विधानामुळे फुटीच्या चर्चेत असलेल्या खासदारांवरील दबाव आणखी वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

“आता बेईमानी करणाऱ्यांना मोकळं सोडायचं नाही. त्यांच्या मतदारसंघात जाऊन जनतेसमोर त्यांना उत्तर द्यावं लागेल. शरद पवार स्वतः त्या भागात सभा घेण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं आहे. कोणत्याही पक्षातील खासदारांनी फूट पाडण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना धडा शिकवला जाईल. यासाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस एकत्र भूमिका घेतील,” अशी माहिती संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी दिली. त्यामुळे चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये आता शरद पवारांचीही सक्रिय एन्ट्री झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचाही उल्लेख केला. “बाळासाहेबांनी आम्हाला अन्यायाविरोधात लढण्याची शिकवण दिली,” असे म्हणत त्यांनी पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले.

दरम्यान, संसदीय पक्षाच्या बैठकीला रवाना होताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका मांडली. “जो आएंगे वो शिवसैनिक, जो नहीं आयेंगे वो गद्दार,” असे म्हणत त्यांनी पक्षनिष्ठेचा मुद्दा अधोरेखित केला, संसदीय बैठकीला सहाही खासदार उपस्थित नव्हते, त्यामुळे आता ठाकरे गटाकडून त्यांच्यावर नेमकी कोणती कारवाई होणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT