Sharad Pawar sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar Video: 'सत्ताधाऱ्यांना राजकीय किंमत मोजावी लागेल...', शरद पवारांचा थेट इशारा; मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थही सांगितला

Sharad Pawar Warns Government : शरद पवारांनी वाढत्या महागाईमुळे थेट केंद्र सरकारला इशारा दिला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महागाई नियंत्रणात ठेवण्याच्या वक्तव्याचा अर्थ देखील समजवून सांगितला आहे.

Roshan More

Sharad Pawar News : वाढती महागाई नियंत्रणात ठेवण्यात सरकारला अपयश येत आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनंतर आता घरगुती सिलेंडरच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान, शरद पवार यांनी देखील सरकारचे कान टोचले आहेत.

'सातत्याने दर वाढत आहेत.या सगळ्याचा परिणाम सामान्य माणसाच्या प्रपंचावर होतोय. आम्ही महागाईवर नियंत्रण ठेवतोय, असे पंतप्रधान सातत्याने सांगतायेत. नियंत्रण म्हणजे टप्याटप्याने झटका द्यायचा, याची राजकीय किंमती सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी कळेल.', असा इशारा देखील शरद पवारांनी दिला.

पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केल्यानंतर आता घरगुती सिलेंडरच्या दरात देखील सरकारने 29 रुपये वाढ केली आहे. या दरवाढीमुळे सामान्य माणसांचे बजेट कोसळणार आहे. गेल्या तीन महिन्यात घरगुती सिलेंडरच्या दरात ही दुसऱ्यांदा झालेली वाढ आहे.

आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम

महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीआयकडून रेपो दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत.मात्र, आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम भारतावर होतो आहे. अमेरिका आणि इराकमधील युद्ध अजून थांबलेले नाही. त्यामुळे इंधनाची सुरळीत पुरवठा होण्यास अडचण येत आहे. त्यामुळे इंधनाचे दर भडकले असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT