Chhagan Bhujbal : सुनिल तटकरेंना जो न्याय तोच भुजबळांना हवा, विषय थेट दिल्लीपर्यंत पोहोचला...

Chhagan Bhujbal, Rajya Sabha Seat : सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर जेष्ठ नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. पण भुजबळांनी ठेवलेल्या अटीमुळे गुंता वाढला आहे.
Chhagan Bhujbal-Sunil Tatkare
Chhagan Bhujbal-Sunil Tatkare Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चेला आता निर्णायक वळण मिळण्याची शक्यता आहे.

दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले. त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती.

तेव्हापासून या जागेवर प्रबळ दावेदार म्हणून मंत्री छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आहे. आता त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता बळावली असून, त्या दृष्टीने राज्यात घडामोडींना वेग आला आहे.

मंत्री भुजबळ राज्यसभेवर जाण्यास सकारात्मक आहेत. मात्र, त्यांच्या जागी माजी खासदार समीर भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी दिली जावी अशी त्यांची इच्छा असून त्यावरुन गाडी अडल्याचे कळत आहे. समीर भुजबळ यांना मंत्रिपद देण्याचा विषय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Chhagan Bhujbal-Sunil Tatkare
NCP Chhagan Bhujbal : राज्यसभेसाठी छगन भुजबळांचे नाव फायनल? मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत वेगवान घडामोडी

परंतु समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विचारावे लागेल. त्यानंतरच अंतिम निर्णय होईल, असे फडणवीस यांनी सांगितल्याचे समजते. त्यामुळे आपल्या जागी मंत्रिपदावर पुतणे समीर यांची वर्णी लागावी यासाठी भुजबळांना भाजपच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांच्या होकाराची वाट पाहावी लागणार आहे.

राष्ट्रवादीच्या कोट्यातील या राज्यसभेच्या जागेवर पक्षातील अनेकांची नावे चर्चेत असताना भुजबळ यांच्या नावावर पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचे कळते आहे. पक्षाचे खासदार पार्थ पवार यांनी भुजबळ यांचे नाव राज्यसभेच्या जागेसाठी सुचविले. त्याला सर्व नेत्यांनी सहमती दर्शविल्यानंतरच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत यासंदर्भात चर्चा केली. या जागेसाठी भुजबळ इच्छुक असून पक्षाची त्याला संमती असल्याचे नेत्यांनी फडणवीस यांना कळवल्याचे समजते.

पुतणे समीर भुजबळ यांचे राजकीय पुनर्वसन व्हावे असे भुजबळांना वाटते. दिवंगत नेते अजित पवार तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती केंद्रात आणि एक व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळात आहे. त्यामुळे हाच न्याय भुजबळ यांनाही लावला जावा, अशी भुजबळ यांची इच्छा आहे. त्यासाठी समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्याचा प्रस्ताव महायुतीसमोर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.

Chhagan Bhujbal-Sunil Tatkare
NCP News : सुनेत्रा पवारांच्या जागी 'राज्यसभेसाठी' 4 माजी खासदारांची फिल्डिंग : दोनदा माघार घेतलेल्या भुजबळांचे नाव पुन्हा आघाडीवर

राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार का? त्यानंतर समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? हे पाहावे लागणार आहे. आज रविवार (दि. ७)पर्यंत यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com