Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar : ईव्हीएमचा मुद्दा पेटणार! मारकडवाडीला शरद पवारांची भेट

Sharad Pawar Will visit Markadwadi : महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएम विरोधी लाँग मार्च आणि बॅलेट पेपरवर मतदान व्हावे यासाठी सर्व प्रचार यंत्रणा मारकडवाडी येथून प्रारंभ करणार आहेत.

Roshan More

Sharad Pawar News : माळशिरसमधील मारकडवाडी गावामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमवर संशय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर हे विजयी झाले आहेत. मात्र, जानकर यांना मत देऊनही त्यांना मत गेले नसल्याचा आक्षेप मारकडवाडीचे ग्रामस्थ घेत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार होते. मात्र, प्रशासनाने त्याला विरोध केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी सकाळी १० वाजता मारकडवाडी (ता. माळशिरस) येथील ग्रामस्थांच्या भेटीला येणार आहेत. मारकडवाडी ग्रामस्थांनी मिळून 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर मतदान करण्याचे ठरविले होते. परंतु, या मतदान प्रक्रियेस प्रशासनाने ठाम विरोध केला. तसेच पोलिसांनी 144 कलम लागू करून बॅलेट पेपरवर मतदान करू नये, जमाव जमवू नये, असे आवाहन केले होते.

ईव्हीएम विरोधातील वातावरणाचा राजकीय फायदा घेण्यासाठी महाविकास आघाडीची प्रमुख नेतेमंडळी ईव्हीएम विरोधी लाँग मार्च आणि बॅलेट पेपरवर मतदान व्हावे यासाठी सर्व प्रचार यंत्रणा मारकडवाडी येथून प्रारंभ करणार आहेत. त्यासाठी राहुल गांधी, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी आदींना या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाने सुरू केला आहे.

याबाबतची प्राथमिक तयारी म्हणून रविवारी शरद पवार हे स्वतः येऊन येथील ग्रामस्थांशी मतदानाविषयी व एकूणच सर्व प्रकाराविषयी चर्चा करणार आहेत आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत, अशी चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT