
Solapur, 06 December : माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत ईव्हीएम विरोधातील आक्रोशाची चिंगारी पेटली आहे. ही चिंगारी संपूर्ण देशभर पेटण्याअगोदर निवडणूक आयोगाने राज्यात तातडीने पुनर्मतदानाचा आदेश काढावा. निवडणूक आयोगाने आदेश काढला नाही, तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत आणि त्यातूनही काही नाही झालं तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी मारकडवाडीमधून लॉंग मार्च काढणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी दिली.
ईव्हीएम विरोधी संयुक्त कृती समितीकडून सोलापुरात आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनात माळशिरसचे आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) सहभागी झाले होते. महाविकास आघाडीच्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व पराभूत उमेदवारांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. त्या आंदोलनात बोलताना जानकर यांनी मारकवाडीतून लाँग मार्च काढण्यासंदर्भात भाष्य केले.
जानकर म्हणाले, ईव्हीएम विरोधात लागलेली आग भडकत गेली, तर पुन्हा राज्यकर्त्यांना थांबवता येणार नाही. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि यशपाल भिंगे हे मारकडवाडीची ऊर्जावान माती घेऊन जाण्यासाठी आले होते. मारकडवाडीची माती राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) हस्ते गांधीजींच्या पुतळ्यासमोर अर्पण करणार आहेत. जसं चंपारण्यमध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनाची सुरुवात झाली, तसं मारकडवाडीमधून लॉंग मार्च निघेल.
जानकर म्हणाले, राज्यात अनेकांनी ईव्हीएमला विरोध केला आहे. मात्र, ती तांत्रिक बाब असल्यामुळे दडपशाहीपुढे ते टिकला नाही. मात्र, त्याचा आता पर्दाफाश होणार आहे. परवा मारकडवाडीने एक साधा सॅम्पल करण्याचा प्रयत्न केला, त्याला जवळपास 18 ते 19 कोटी लोकांनी दाद दिली. भारतातील निम्म्यापेक्षा जास्त लोकांनी त्या घटनेच स्टेट्स ठेवलं होतं. लोकांमध्ये किती आग आहे, उद्रेक आहे, हे यातून दिसून येते.
व्हीव्हीपॅटमध्ये जी चिठ्ठी छापली जाते, त्यामध्ये एका बाजूला कमळ आणि दुसऱ्या बाजूला तुतारी छापली जाते. कालांतराने दुसरं चित्र पुसून जाते आणि कमळाचे चिन्ह काउंट होते, असा आरोपही आमदार उत्तम जानकर यांनी केला.
ते म्हणाले, माळशिरस तालुक्यातील 91 गावाच्या लोकांचा मतदान हे बॅलेट पेपर वर घ्यावा, असा आक्रोश होता. कारण मला जेवढी मतं पडली आहेत, तेवढी भाजपला डायवर्ट झाली आहेत. माझ्या मतदारसंघात मी किमान दीड लाखाच्या फरकाने निवडून यायला पाहिजे होतो. मारकडवाडीत प्रशासनाने फोर्स, सीआरपीएफच्या 3 तुकड्या पाठवल्या. आमच्यावर गुन्हे दाखल केले, आम्ही काय राष्ट्रद्रोह केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.