Sharmila Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Sharmila Thackeray : 'तुम्ही कमीत कमी छत्रपतींना तरी सोडा' ; शर्मिला ठाकरेंचा संताप!

Mayur Ratnaparkhe

Sharmila Thackeray on Rajkot Fort Shivaji Maharaj Statue incident मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यातील राजकीय, सामाजिक वातावरण चांगलंच तापलेलं आहे. या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. याशिवाय, विरोधकांनी तर राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. सरकारकडूनही या घटनेवर भूमिका स्पष्ट करण्यात आली असून, दोषींवर कारवाई केली जाईळ आणि लवकरच भव्य पुतळा उभारला जाईल असे सांगितले जात आहे.

या घटनेवरून मनसेनेही(MNS) आक्रमक भूमिका घेत, टीका केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. तर आता त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया देत, तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर शर्मिला ठाकरेंनी(Sharmila Thackeray) एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार करता, निदान छत्रपतींना तरी सोडा. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आतून पोकळच होता. असा पोकळ पुतळा कोणी समुद्र किनारी उभं करतं का? महाराजांनी बांधलेले गड-किल्ले आजही तसेच आहेत आणि अवघ्या आठ महिन्यांमध्ये यांनी बांधलेला पुतळा कोसळला. पडलेला पुतळा हा अखंड पोकळ होता, असा पोकळ पुतळा कोण समुद्र किनारी उभं करतं?

350 वर्षांपूर्वी छत्रपतींनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला अजूनही उभा आहे. प्रतापगड, रायगड अनेक गड-किल्ले आहेत. तटबंदी का असेना पण उभी आहे. कितीतरी जास्त वारा ही तटबंदी अजूनही सोसते आहे. पण दु:ख याचं वाटतं, तुम्ही कमीत कमी छत्रपतींना तरी सोडा. मुंबई-नाशिक रस्त्यामध्ये भ्रष्टाचार, मुंबई-गोवा महामार्गावर इतके खड्डे आहेत, आम्ही आंदोलन करून थकलो. अशा शब्दांत शर्मिला ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT