Sheikh Hasina News : बांग्लादेशच्या पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर देश सोडून भारतात आलेल्या शेख हसीना आता पुन्हा आपल्या देशात परतणार आहेत. बांग्लादेशात निवडणुका झाल्यानंतर विरोधी पक्षातील तारीक रहमान हे सत्तेत आले. ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे शेख हसीना पुन्हा देशात परणार असल्याने त्यांच्यापुढे आव्हान उभे राहणार आहे. 16 डिसेंबरला त्या मायदेशी परणार असल्याची माहिती आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शेख हसीना यांनी पाच ऑगस्ट 2024 ला आपला देश सोडला होता. त्यांनी दिल्लीमध्ये आश्रय घेतला होता. दरम्यान, त्यांच्या विरोधात वेगवेगळे केस दाखल आहेत. त्याच्या सुनावणी कोर्टात सुरू आहे. त्यामुळे बांग्लादेशात दाखल होताच त्यांची रवानगी थेट तुरुंगात होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर त्यांच्या अवामी लीग पक्षातील अनेक नेत्यांनी पक्ष सोडला होता. दुसऱ्या पक्षात प्रवेश केला किंवा कट्टरवाद्यांकडून स्वतःचा जीव वाचवून जीवन जगत आहेत. या परिस्थितीमध्ये हसीना या पुन्हा देशात आल्याने त्यांच्या पक्ष पुन्हा मजबूत होईल आणि तारीक रहमान यांच्या पक्षाला टक्कर देईल, असे बोलले जात आहे.
बांग्लादेशात अवामी लीग पक्षावर बंदी घालण्यात आली आहे. शेख हसीना जर बांग्लादेशात आल्या तर त्यांना अटक करून त्यांची रवानगी थेट तुरुंगात करू, असा इशारा विदेश मंत्री शमा ओबैद यांनी दिला आहे. दरम्यान, शेख हसीना या डिसेंबरमध्ये देशात परत येण्याच्या चर्चांनी त्यांच्या पक्षाती कार्यकर्ते अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी देशभर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधी प्रदर्शन केले आहे.