RSS Election Survey : भाजप सर्वात मोठ्या राज्यात सत्तेपासून दूर राहणार? 'आरएसएस'च्या सर्व्हेत धक्कादायक आकडेवारी

BJP Setback UP Election : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मतदारांची पसंती मिळते आहे. मात्र, आमदारांविषयी असलेल्या नाराजीचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on: 
Updated on: 

BJP News : पुढील वर्षी होत असलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश हे राज्य भाजपसाठी खूपच महत्त्वाचे आहे. मागील दहा वर्षांपासून ते येथे सत्तेत आहेत. मात्र, पुन्हा सत्तेत येण्यासाठी त्यांच्यापुढे आव्हान असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व्हेतून दिसत आहे.

संघाच्या सर्व्हेतून उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 170 ते 185 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विषयी ज्येष्ठ पत्रकार समीर चौगांवकर यांनी 'न्यूज तक'शी बोलताना माहिती दिली. दरम्यान, युपी विधानसभेची सदस्य संख्या 403 आहे. बहुमतासाठी 202 जागांची आवश्यकता आहे.

संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी एका बैठकीत प्रेझेंटेशन केले होते. त्यामध्ये त्यांनी 75 जिल्ह्यांमधील 403 मतदारसंघांचा उल्लेख केला होता. निवडणुकीच्याआधी जमिनीवरचे वास्तव का आहे? याची माहिती भाजपच्या नेत्यांना दिली होती. त्यामध्ये भाजपला 170 ते 185 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

भाजपसोबत जो सवर्ण मतदार आहे तो युजीसी बीलामुळे काहीसा नाराज आहे. तसेच मागील दहा वर्षांपासून सत्तेत असल्याने अँटी इन्कम्बन्सी आहे, त्याचा फटका बसताना दिसतो आहे. तसेच आमदारांविषयी नाराजी आहे, असे संघाच्या सर्व्हेतून दिसून आले.

BJP
UP Election : उत्तर प्रदेशच्या 403 मतदारसंघांत भाजपची खास फिल्डिंग; आठ राज्यांतील महिला पदाधिकारी मैदानात, विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी

CM योगी आदित्यनाथांवर विश्वास

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मात्र मतदारांची पसंती मिळते आहे. मात्र, आमदारांविषयी असलेल्या नाराजीचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संघाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि भाजप संघटनेतील नेत्यांची दोन डिसेंबरला बैठक होणार आहे. या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरण्याची शक्यता आहे.

BJP
UP Election 2027: युपीत नवं सत्तासमीकरण! चंद्रशेखर आझाद मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; भाजप, सपामध्ये खळबळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.