Ajit Pawar sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar : शिखर बँक घोटाळा प्रकरण : उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अडचणीत वाढ

Sachin Waghmare

Mumbai News : शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात विशेष सत्र न्यायालयाने तपासाचा प्रगत अहवाल मागवला आहे. न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला ६ जानेवारीपूर्वी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते अडचणीत आले आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने अधिक तपासाची 'टाईमलाईन' ही मागवली होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह शालिनीताई पाटील व माणिकराव जाधव यांनी निषेध याचिका दाखल केली होती. क्लोजर रिपोर्ट रद्द करण्याच्या मागणीसाठी ही विशेष याचिका केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकरणात ईओडब्ल्यूने क्लोजर रिपोर्ट रद्द करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली असून त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला नव्याने चालना मिळणार असल्याने बँकेचे संचालक चिंतेत आहे. न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला ६ जानेवारीपूर्वी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT